४० लाखांवर पासवर्ड हॅक

By admin | Published: September 11, 2014 11:08 PM2014-09-11T23:08:12+5:302014-09-11T23:08:12+5:30

रशियन हॅकर्सनी सुमारे ४० लाख ९३ हजार जी-मेल आयडी आणि पासवर्ड हॅक केल्याचे उघड झाले आहे़

40 million password hacks | ४० लाखांवर पासवर्ड हॅक

४० लाखांवर पासवर्ड हॅक

Next

नवी दिल्ली : रशियन हॅकर्सनी सुमारे ४० लाख ९३ हजार जी-मेल आयडी आणि पासवर्ड हॅक केल्याचे उघड झाले आहे़ गुगलचे उत्पादन असलेल्या जी-मेल, गुगल ड्राईव्ह, गुगल प्लस, गुगल मॅप, यू ट्यूब यांच्यासाठी एकाच पासवर्डचा वापर होत असल्याने यांना धोका निर्माण झाला आहे़
हॅकर्सनी खातेदारांची माहिती बीटीसीएसईसी डॉट कॉमवर उघड केली असून आपले नाव टीव्हीस्किट असे सांगितले आहे़ हॅक करण्यात आलेल्या पासवर्डपैकी ६० टक्के पासवर्ड अद्यापही सुरू असल्याचा दावाही या टीव्हीस्किट नामक हॅकर्सकडून करण्यात आला आहे़ गुगलने मात्र हा दावा नाकारला असून केवळ २ टक्के पासवर्ड अद्यापही सुरू असल्याचे म्हटले आहे़ शिवाय आपल्या खातेदारांची कोणतीही माहिती चोरी गेली नसल्याचा प्रतिदावा केला आहे़ गुगलची अ‍ॅटोमेटेड अण्टी हायजॅकिंग सिस्टिम लॉगिनचे प्रयत्न रोखू शकते़ पासवर्ड हायजॅक झाले असतील तरी आपल्या प्रणालीतील त्रुटींमुळे ते झालेले नाहीत, असा दावाही गुगलने केला आहे़ दरम्यान तज्ज्ञांनी या हॅकर्सच्या तावडीतून वाचण्यासाठी खातेदारांनी त्वरित आपला पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 40 million password hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.