लिपीक पदासाठी ४० प्रश्न सोपे जि.प.ची पदभरती :प्रशासनाचा दुसरा पेपरही गेला चांगला!
By Admin | Published: November 28, 2015 11:55 PM2015-11-28T23:55:08+5:302015-11-28T23:55:08+5:30
जळगाव- जिल्हा परिषदेच्या भरतीसंबंधी दुसर्या टप्प्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पशुधन पर्यवेक्षक आणि लिपीक या जागांसाठी शनिवारी शहरात १० केंद्रांवर परीक्षा झाली. त्यात लिपीक पदासाठी १०० गुणांच्या लेखी परीक्षेत ४० प्रश्न सोपे, पण ६० प्रश्न अवघड होते. अर्थातच उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागेल हे स्पष्ट झाले आहे.
ज गाव- जिल्हा परिषदेच्या भरतीसंबंधी दुसर्या टप्प्यात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), पशुधन पर्यवेक्षक आणि लिपीक या जागांसाठी शनिवारी शहरात १० केंद्रांवर परीक्षा झाली. त्यात लिपीक पदासाठी १०० गुणांच्या लेखी परीक्षेत ४० प्रश्न सोपे, पण ६० प्रश्न अवघड होते. अर्थातच उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांचा चांगलाच कस लागेल हे स्पष्ट झाले आहे. अनेक महिलांनी ही परीक्षा दिली. त्यांचे चिमुकलेही आल्याचे दिसले. त्यांचा सांभाळ करण्यासाठी पतिराज, आईवडील आले होते. केंद्रानजीक परीक्षार्थींचे नातेवाईक एकत्र आल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या पाल्याच्या परीक्षेबाबतची काळजी पदोपदी होती, असे पाहणीदरम्यान जाणवले. जि.प.तर्फे २५ रोजी आरोग्यसेवक, कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी या पदांसाठी परीक्षा झाली. मागील आणि शनिवारची परीक्षा शांततेत पार पडली. अर्थातच नियोजन आणि परीक्षेदरम्यानची चोख जबाबदारी यामुळे प्रशासनाला दोन टप्प्यांमध्ये परीक्षेचे काम व्यवस्थितपणे पार पाडता आले. कनिष्ठ अभियंंता पदाच्या तीन जागांसाठी ३५५ उमेदवारांनी तर पशुधन पर्यवेक्षपदाच्या दोन जागांसाठी ५७ उमेदवारांनी परीक्षा दिली. सकाळी १० ते ११.३० या दरम्यान शहरात विद्यानिकेतन विद्यालय, ला.ना. आणि नंदिनीबाई विद्यालयात ही परीक्षा झाली.तर कनिष्ठ लिपीकांच्या सात जागांसाठी १५६३ उमेदवारांनी परीक्षा दिली. ३३३ उमेदवार गैरहजर राहीले. कोल्हे, लुंकड, अँग्लो उर्दू, खुबचंद सागरमल, राऊत आदी विद्यालयांमधील केंद्रांवर ही परीक्षा झाली, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी दिली.