40 वर्षांपासून दहशतवाद सहन करत आहोत, आता घरात घुसून मारणार - मोदींचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 08:45 PM2019-03-04T20:45:26+5:302019-03-04T20:47:38+5:30

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधे केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तसेच देशांतर्गत राजकारणही तापले आहे.

For 40 years, we are facing terrorism - Narendra Modi | 40 वर्षांपासून दहशतवाद सहन करत आहोत, आता घरात घुसून मारणार - मोदींचे आव्हान 

दहशतवादी अगदी सातव्या पाताळात लपून बसले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही

Next
ठळक मुद्दे

अहमदाबाद  - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधे केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारत आणि पाकिस्तानध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. तसेच देशांतर्गत राजकारणही तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. भारत गेल्या 40 वर्षांपासून दहशतवादाचे दुखणे झेलत आहे. मात्र आता दहशतवादाला सहन केले जाणार नाही. जर कुणी दहशतवाद्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. तर अशांना घरात घुसून मारू, अशा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
 
गुजरातमधील अहमदाबाद येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, '' भारत गेल्या 40 वर्षांपासून दहशतवादाचे दुखणे झेलत आहे. मात्र आता दहशतवादाला सहन केले जाणार नाही. जर कुणी दहशतवाद्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. तर अशांना घरात घुसून मारू, एकेका दहशतवाद्याला वेचून टिपणे हेच आमचे धोरण आहे. दहशतवाद्यांना घरात घुसून मारणे हाच आमचा सिद्धांत आहे.'' 





 पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान आज त्यांनी गांधीनगर येथे विविध प्रकल्पांची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एका सभेला संबोधित केले. ''मी आज अहमदाबाद येथे आलो आहे. सिव्हील रुग्णालायातील 2008 चे दृष्य मी विसरू शकत नाही. दहशतवादी अगदी सातव्या पाताळात लपून बसले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही. असेही मोदी यावेळी म्हणाले.  



 

Web Title: For 40 years, we are facing terrorism - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.