४०० बॅनर्स आगीत जळून खाक

By admin | Published: October 30, 2016 10:44 PM2016-10-30T22:44:59+5:302016-10-30T22:44:59+5:30

जळगाव: मनपाने जप्त करुन बालगंधर्व नाट्यगृहाजवळ ठेवलेल्या बॅनर्सला रविवारी दुपारी एक वाजता अचानक आग लागली. त्यात ४०० बॅनर्स व एक हातगाडी जळून खाक झाली आहे. त्याचा फक्त सांगाळाच शिल्लक आहे. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागली असावी असा अंदाज मनपाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे ही आग विझविण्यात आली.

400 banners burnt in the fire | ४०० बॅनर्स आगीत जळून खाक

४०० बॅनर्स आगीत जळून खाक

Next
गाव: मनपाने जप्त करुन बालगंधर्व नाट्यगृहाजवळ ठेवलेल्या बॅनर्सला रविवारी दुपारी एक वाजता अचानक आग लागली. त्यात ४०० बॅनर्स व एक हातगाडी जळून खाक झाली आहे. त्याचा फक्त सांगाळाच शिल्लक आहे. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागली असावी असा अंदाज मनपाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे ही आग विझविण्यात आली.
महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या मोहीमेत अनाधिकृत बॅनर्स जप्त करुन ते जुने बी.जे.मार्केटजवळ असलेल्या बालगंधर्व नाट्यगृहाला लागून मोकळ्या जागेत ठेवण्यात येतात. या ठिकाणी ४ ते ५ हजार बॅनर्स व काही हातगाड्या आहेत. रविवारी या परिसरात फटाके फोडले जात होते, त्याची ठिणगी या बनर्सवर उडाल्याने हळूहळू जळत मोठी आग लागली. बालगंधर्व नाट्यगृहात कुस्तीसाठी आलेल्या काही तरुणांना शेजारी धूर निघत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने ही बाब नाट्यगृहाच्या कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.
मनपा कर्मचार्‍यांची धावपळ
अग्निशमन दलाला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने बंब घटनास्थळावर रवाना केले. पहिला बंब संपल्यानंतर दुसरा बंब बोलावण्यात आला. अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच.एम.खान व सहकार्‍यांनीही घटनास्थळ गाठले. संपूर्ण आग विझविल्यानंतर कर्मचारी तेथून रवाना झाले. वेळीच आग विझविण्यात आल्यामुळे मोठी घटना टळली.
लाखो रुपयांचे नुकसान
या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जप्त केलेला मुद्देमाल परत केला जात नाही, तो नष्ट केला जातो किंवा त्याचा लिलाव केला जातो. यातील फ्रेमचा लिलाव होवू शकतो, कापड मात्र निरुपयोगी ठरतात. या घटनेत चारशे बॅनर्स व एक हातगाडी खाक झाली आहे. शिल्लक हातगाडी व व हजारो बॅनर्स सुरक्षित आहेत.

Web Title: 400 banners burnt in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.