प्रवाशास लुटणार्या रिक्षाचालकासह चौघांना अटक ४० हजारांची रोकड जप्त : सरकारवाडा पोलिसांकडून पाच तासांत छडा
By admin | Published: May 6, 2016 02:09 AM2016-05-06T02:09:14+5:302016-05-06T02:09:14+5:30
नाशिक : ओळखीचा फायदा घेत अशोकस्तंभ येथून एका रिक्षाचालकाने व्यवसायानिमित्त नेहमी नाशकात येणार्या एका प्रवाशास गंगापूर गावाच्या पुढे नेऊन मारहाण करत लुटल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ाचा वेगाने तपास करत अवघ्या पाच तासांत सरकारवाडा पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे.
Next
न शिक : ओळखीचा फायदा घेत अशोकस्तंभ येथून एका रिक्षाचालकाने व्यवसायानिमित्त नेहमी नाशकात येणार्या एका प्रवाशास गंगापूर गावाच्या पुढे नेऊन मारहाण करत लुटल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ाचा वेगाने तपास करत अवघ्या पाच तासांत सरकारवाडा पोलिसांनी रिक्षाचालकासह त्याच्या चार साथीदारांना अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कृष्णा गंगय्या रेड्डी (२८, रा. दातवली, दिवा ) यांचा केटरिंग व्यवसाय आहे. यानिमित्त रेड्डी यांचे शहरात येणे-जाणे सुरू होते. ते २८ एप्रिलपासून शहरात होते. मंगळवारी (दि.३) दुपारी रेड्डी हे स्तंभावरून रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रिक्षाचा शोध घेत होते. त्या दरम्यान, तोंडओळख असलेला रिक्षाचालक अक्षय दिलीप जाधव (२२, रा. राजवाडा, गंगापूर) याने रेड्डी यांच्याशी संवाद साधून ओळख सांगितली व रिक्षात बसविले. दरम्यान, भोजनाचे कारण देऊन त्यांचा विश्वास संपादन करत गंगापूर गावाच्या पुढे नेऊ न जाधव याने आपल्या काही साथीदारांना बोलावून घेत संध्याकाळच्या सुमारास रेड्डी यांना लाकडी दांडुक्यांनी मारहाण केली. त्यांच्याजवळील ऐंशी हजार रुपयांची रोकड, भ्रमणध्वनी हिसकावून घेत पळ काढला. सकाळी ते पुन्हा स्तंभावर आले व मल्हारखाण या भागात त्या रिक्षाचालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार रेड्डी यांना पोलिसांनी शोधून त्यांची विचारपूस केली असता त्यांनी घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर अवघ्या पाच तासांमध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाने गुन्ाचा छडा लावून रिक्षाचालकासह चार संशयितांना अटक केली.इन्फो........दीड लाखांचा मुद्देमालउपआयुक्त एन. अंबिका, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व गुन्हे शोध पथकाने वेगाने तपास करत संशयित रिक्षाचालक व त्याचे साथीदार अजिंक्य सुधीर पवार (२२), विशाल राजू लोखंडे (२१), राहुल प्रकाश वाघमारे (२०), मंगेश श्यामराव गायकवाड (२२) यांना अटक केली. रिक्षा (एमएच १५, ईएच ३८३८), चोरीस गेलेल्या रोकडपैकी ४१ हजार रुपये रोख, बारा हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा भ्रमणध्वनी, लाकडी दांडुके, आरोपींचे दोन भ्रमणध्वनी असा एकूण एक लाख ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत (दि.६) पोलीस कोठडी सुनावली आहे.