शेतकर्‍यांवर डोक्यावर ४ हजार कोटींचे कर्ज पतपुरवठा: राष्ट्रीयकृत,सहकारी आणि खासगी बँकांचा समावेश

By Admin | Published: March 25, 2015 09:09 PM2015-03-25T21:09:58+5:302015-03-25T21:09:58+5:30

अहमदनगर: सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्‘ातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही़ या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही़ शेतीही सोडता येत नाही़ अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकर्‍यांनी स्वत: खंबीर होत, त्यातून मार्ग काढण्यास सुरुवात केली़ गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी जिल्‘ातील शेतकर्‍यांनी विविध बँकांकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतल्याचे वास्तव एका अहवालावरून समोर आले आहे़ ही फक्त राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांची स्थिती असून, अन्य सावकार व पतसंस्थांचा विचार केल्यास कर्जाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़

4000 crores debt credit on farmers: Nationalized, co-operative and private banks are included | शेतकर्‍यांवर डोक्यावर ४ हजार कोटींचे कर्ज पतपुरवठा: राष्ट्रीयकृत,सहकारी आणि खासगी बँकांचा समावेश

शेतकर्‍यांवर डोक्यावर ४ हजार कोटींचे कर्ज पतपुरवठा: राष्ट्रीयकृत,सहकारी आणि खासगी बँकांचा समावेश

googlenewsNext
मदनगर: सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही़ या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही़ शेतीही सोडता येत नाही़ अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकर्‍यांनी स्वत: खंबीर होत, त्यातून मार्ग काढण्यास सुरुवात केली़ गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विविध बँकांकडून ४ हजार कोटींचे कर्ज घेतल्याचे वास्तव एका अहवालावरून समोर आले आहे़ ही फक्त राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांची स्थिती असून, अन्य सावकार व पतसंस्थांचा विचार केल्यास कर्जाचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़
दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेती व्यवसायाला अवकळा आली़ पिकांचा वाढता खर्च आणि मिळणारे उत्पन्न, याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांच्या पदरात वर्षभर काहीच पडले नाही़ त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली़ कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे़ पण शेती काही सोडता येत नाही़ एक पीक गेले म्हणून हातावर हात ठेवून न बसता पुढचे पीक पदरात पाडून घेण्यासाठी बळीराजाने बँकांचा रस्ता धरला़ पीक येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल, अशी आशा बाळगून असलेल्या शेतकर्‍यांनी चालू आर्थिक वर्षात तब्बल ४ हजार १९ कोटीचे कर्ज घेतले़ याशिवाय सावकारी व पतसंस्थांकडून घेतलेला कर्जाचा आकडाही काही कोटींच्या घरात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ एकूणच शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर वाढत असून, पिकातून मात्र काहीच साध्य होत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे़
जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी गेल्या वर्षभरात राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांकडून २ हजार ७१९ कोटींचे पीक कर्ज घेतले़ शेतीसाठीच पण मध्यम मुदतीचे २ हजार ३०९ कोटींचे कर्ज विविध बँकांकडून घेतले गेले आहे़ पण ज्या पिकांसाठी हे कर्ज घेतले, ती पिके शेतातच वाया गेली़ खरीप आणि त्यापाठोपाठ रब्बीची पिके हातची गेली़ निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांना बँकांचे घेतलेले कर्ज परत करणे कठीण झाले झाले आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकर्‍यांना बँकांची पायरी चढावी लागली़ कर्ज घेतले पण पीक आले नाही़ त्यामुळे बँकांच्या कर्ज फेर्‍यात जिल्ह्यातील बळीराजा अडकला असून, त्यातून बाहेर कसे पडायचे, असा पेच शेतकर्‍यांसमोर आहे़
़़़

Web Title: 4000 crores debt credit on farmers: Nationalized, co-operative and private banks are included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.