कोकण रेल्वेसाठी ४,००० कोटी

By admin | Published: April 8, 2017 05:36 AM2017-04-08T05:36:13+5:302017-04-08T05:36:13+5:30

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे

4,000 crores for Konkan Railway | कोकण रेल्वेसाठी ४,००० कोटी

कोकण रेल्वेसाठी ४,००० कोटी

Next

नवी दिल्ली : कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार असून, त्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा सुरेश प्रभू यांनी केली आहे.
रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण, नव्या रेल्वे स्थानकांची निर्मिती, तसेच चिपळूण-कराड नवी मार्गाची उभारणी ही कामेही करण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>महत्त्वाचा मार्ग
चिपळूण-कराड मार्ग झाल्यामुळे कोकणातून थेट पश्चिम महाराष्ट्रात रेल्वेने जाणेही शक्य होईल, तसेच तेथून दक्षिण रेल्वेलाही कोकण जोडले जाईल. त्यामुळे हा मार्ग अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे.
चार वर्षांत पूर्ण विद्युतीकरण... ट्रॅकची व ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार असून, लूप लाइन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करतानाच कोकण रेल्वेने विद्युतीकरणावरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, चार वर्षांमध्ये संपूर्ण कोकण रेल्वेचे विद्युतीकरण केले जाणार आहे.

Web Title: 4,000 crores for Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.