बनावट प्रमाणपत्रावर ४१ वर्षे पोलीस सेवा, निवृत्तीच्या २ वर्ष आधी झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 10:05 PM2024-02-03T22:05:30+5:302024-02-03T22:06:10+5:30
मध्य प्रदेशात एक बनावट प्रमाणपत्र देऊन पोलीस विभागात नोकरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
पोलीस विभागालाच फसवणूक तब्बल ४२ वर्षे नोकरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधील आहे. बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे गेल्या ४१ वर्षांपासून येथे एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. पोलीस खात्यात रुजू होऊन २३ वर्षांनंतर आरोपी हवालदाराविरुद्ध बनावट जात प्रमाणपत्राबाबत तक्रार प्राप्त झाली. अशा प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांना अनेक वर्षे लागली.
याबाबत न्यायालयीन कामकाजासाठी १२ वर्षे लागली. अशाप्रकारे ४१ वर्षांनंतर आरोपी हवालदाराने पोलिस खात्याची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. न्यायालयाने त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे, त्यांच्या निवृत्तीच्या अवघ्या २ वर्ष आधी. चार हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. वर्ष २००६ मध्ये, आरोपी कॉन्स्टेबल सत्यनारायण वैष्णव विरुद्ध इंदूरच्या छोटी ग्वालटोली पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने तो बनावट जात प्रमाणपत्रावर काम करत असल्याचे दोषी आढळले. पोलीस तपास समितीने १८ डिसेंबर २०१३ रोजी न्यायालयात चलन सादर केले होते. यानंतर न्यायालयात खटला चालला. आता या प्रकरणाचा निर्णय २०२४ मध्ये आला आहे.
इराकमध्ये अमेरिकेचं एअर स्ट्राईक; हल्ल्यात १६ नागरिकांचा मृत्यू, इराक सरकार भडकलं
जिल्हा सार्वजनिक अभियोक्ता अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, चौथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयदीप सिंग यांनी दोन कलमांतर्गत १० वर्षे आणि इतर दोन कलमांतर्गत प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपी कॉन्स्टेबल सत्यनारायण वैष्णव याला कोर्टाने चार हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सत्यनारायण वैष्णव हा इंदूरचा रहिवासी आहे. त्यांचा जन्म ७ जून १९६४ रोजी झाला. ४ ऑगस्ट १९८३ रोजी वयाच्या १९ व्या वर्षी ते पोलीस खात्यात हवालदार म्हणून भरती झाले. २३ वर्षांनंतर ६ मे २००६ रोजी इंदूरच्या छोटी ग्वालटोली पोलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली की, आरोपी कॉन्स्टेबल सत्यनारायण वैष्णव याने बॅज नं. १२७३ बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी करत आहेत. यासोबतच तपास अहवालही देण्यात आला, यामध्ये तक्रारदार वर्षा साधू, आरोपी सत्यनारायण, ऋषी कुमार अग्निहोत्री आणि ईश्वर वैष्णव यांचे जबाब नोंदवण्यात आले. आरोपीने कोरी समाजाचे जात प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली, तर तो उच्चवर्णीय असल्याचे सांगण्यात आले.
फिर्यादीने पोलिसांना असेही सांगितले की, आरोपी, त्यांचे वडील रामचरण वैष्णव, त्याचा मोठा भाऊ श्यामलाल वैष्णव आणि लहान भाऊ ईश्वर वैष्णव हे सर्व वैष्णव ब्राह्मण आहेत. असे असतानाही सत्यनारायण वैष्णव यांनी कोरी समाज जात प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सहा वर्षे तपास सुरू ठेवला. यावेळी आरोपी हवालदाराने प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर अतिरिक्त तहसीलदार इंदूर यांच्या तहसील कार्यालयाकडून जात प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले. त्यात आरोपीची जात कोरी समाज असे नमूद करण्यात आले आहे. तपासात साक्षीदार व जबाबाच्या आधारे आरोपी सत्यनारायण वैष्णव याने बनावट आधारावर नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने जात प्रमाणपत्र तयार केल्याचेही निष्पन्न झाले.
भावाच्या मार्कशीटवर ४३ वर्षे नोकरी केली
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. येथे महापालिकेतील एका कर्मचाऱ्याने सहाय्यक वर्ग-3 ची नोकरी तब्बल ४३ वर्षे कायम ठेवली. निवृत्तीची वेळही जवळ आली. निवृत्तीनंतर आता तो आरामदायी जीवन जगेल, असे वाटत होते, पण एका तक्रारीने त्याचे सर्व काही उद्ध्वस्त केले, कारण ४३ वर्षांपूर्वी नोकरी लावून मिळालेली मार्कशीट बनावट असल्याचे तक्रारीत उघड झाले आहे. कैलास कुशवाह असे आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. भावाची गुणपत्रिका सादर करून त्यांनी महापालिकेत नोकरी मिळवली होती. मात्र तक्रारीमुळे त्यांची फसवणूक उघड झाली होती.