चंद्रावर पोहोचायला ४२ दिवस, सूर्यापर्यंत जायला किती वेळ लागेल, नेमकं अंतर किती?, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 04:36 PM2023-08-28T16:36:23+5:302023-08-28T16:44:24+5:30
Aditya-L1 Launch Date: सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली भारतीय मोहीम असणार आहे.
नवी दिल्ली: चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोहीम सुरू केली आहे. आता इस्रो सूर्याकडे जाण्याच्या तयारीत आहे. इस्रो २ सप्टेंबर रोजी सूर्य मोहीम लॉन्चिंग करणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती इस्रोने दिली असून आदित्य-L1 चे प्रक्षेपण २ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथून ११.५० वाजता होणार आहे. खरं तर सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली भारतीय मोहीम असणार आहे.
आदित्य-L1 मिशन हे सूर्याचे तापमान, सूर्य किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, विशेषतः ओझोनचा थर, अवकाशातील हवामानाची गतिशीलता यांचा अभ्यास करणार आहे. बंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयातून याचे प्रक्षेपण केले जाईल. ISRO दोन सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता श्रीहरिकोटा येथून सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आदित्य-L1 लॉन्च करेल.
चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचायला ४२ दिवस लागले. तर आदित्य-L1 सूर्याभोवती पोहचण्यासाठी साधारण ४ महिने लागणार आहे. श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी आदित्य-L1 पृथ्वीपासून १५ कोटी किलोमीटर दूर असलेल्या लॅन्ग्रेस पॉइंट म्हणजेच L-1 या विशेष ठिकाणी पोहोचेल. या मोहिमेद्वारे हवामान आणि सौर क्रियाकलापांचा पृथ्वीवर होणारा परिणाम कळणार आहे. माहितीनुसार, आदित्य L1 फोटोस्फियर (म्हणजेच सूर्याचा जो भाग आपण पाहतो तो), क्रोमोस्फियर (फोटोस्फियरचा वरचा भाग) आणि कोरोना, म्हणजेच सूर्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या त्याच्या बाह्य स्तराचा अभ्यास करणार आहे.
🚀PSLV-C57/🛰️Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) August 28, 2023
The launch of Aditya-L1,
the first space-based Indian observatory to study the Sun ☀️, is scheduled for
🗓️September 2, 2023, at
🕛11:50 Hrs. IST from Sriharikota.
Citizens are invited to witness the launch from the Launch View Gallery at… pic.twitter.com/bjhM5mZNrx
ताऱ्यांच्या अभ्यासात सर्वाधिक मदत होणार-
इस्रोच्या मते, सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आहे. तार्यांच्या अभ्यासात हे आपल्याला सर्वात जास्त मदत करू शकतो. यातून मिळालेल्या माहितीमुळे इतर तारे, आपली आकाशगंगा आणि खगोलशास्त्रातील अनेक रहस्ये आणि नियम समजण्यास मदत होईल. सूर्य आपल्या पृथ्वीपासून सुमारे १५ कोटी किलोमीटर दूर आहे.
सात उपकरणे बसवण्यात येणार-
- दृश्यमान उत्सर्जन रेषा कोरोनाग्राफ: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (बंगळुरू) द्वारे तयार केले गेले. त्यात सूर्याच्या कोरोना आणि उत्सर्जनातील बदलांचा अभ्यास केला जाईल.
- सोलर अल्ट्रा-व्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप: इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (पुणे) द्वारे विकसित करण्यात आले आहे. ते सूर्यप्रकाशातील छायाचित्रे आणि क्रोमोस्फियरची छायाचित्रे घेईल. ही जवळपास अतिनील श्रेणीतील चित्रे असतील, हा प्रकाश जवळजवळ अदृश्य असतो.
- SOLEX आणि HEL1OS: सौर कमी-ऊर्जा आणि एक्स रे स्पेक्ट्रोमीटर (SOLEX) आणि उच्च-ऊर्जा L1 ऑर्बिटिंग एक्स रे स्पेक्ट्रोमीटर (HEL1OS) बेंगळुरू येथील UR राव उपग्रह केंद्राने बांधले होते. सूर्याच्या एक्स रेचा अभ्यास हे त्याचे कार्य आहे.
- एसपेक्स और पापा: भौतिक संशोधन प्रयोगशाळा (अहमदाबाद) द्वारे आदित्य सौर पवन प्रयोग (Aspex) आणि अंतराळ भौतिकशास्त्र प्रयोगशाळा विक्रम साराभाई स्पेस सेंटर (तिरुवनंतपुरम) यांनी आदित्य (पापा) साठी प्लाझ्मा विश्लेषक पॅकेज तयार केले आहे. सौर वाऱ्याचा अभ्यास करणे आणि ऊर्जेचे वितरण समजून घेणे हे त्यांचे काम आहे.
- मॅग्नेटोमीटर (मॅग): इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्स प्रयोगशाळा (बंगलोर) द्वारे बनविलेले. हे L1 कक्षाभोवती आंतरग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजेल.