फिजीमधील चक्रीवादळात ४२ जणांचा मृत्यू

By admin | Published: February 24, 2016 05:05 PM2016-02-24T17:05:41+5:302016-02-24T17:07:48+5:30

विन्स्टन चक्रीवादळामुळे फिजी देशातील ४२ जणांनी आपला जीव गमावला आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या वादळामुळे फिजी देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे

42 deaths in Fiji | फिजीमधील चक्रीवादळात ४२ जणांचा मृत्यू

फिजीमधील चक्रीवादळात ४२ जणांचा मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत -
फिजी, दि. २४ - विन्स्टन चक्रीवादळामुळे फिजी देशातील ४२ जणांनी आपला जीव गमावला आहे. इतिहासातील सर्वात मोठ्या वादळामुळे फिजी देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

न्यूजीलंडने नौदलाचे २ जहाज तसंच बचावकार्य पथक पाठवत असल्यांचं सांगितल आहे मात्र ते अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही. मंगळवारी २९वर असणारा मृतांचा आकडा आज ४२वर पोहोचला आहे. हा आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती फिजी सरकारचे प्रवक्ते डॅन यांनी ट्विटरवरुन दिली आहे. आपत्ती पथक शक्य तितक्या ठिकाणी पोहोचण्याच प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
 

Web Title: 42 deaths in Fiji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.