४२ हजार शेतकरी कर्जासाठी बँका, सावकाराच्या दारी

By Admin | Published: July 2, 2015 11:47 PM2015-07-02T23:47:29+5:302015-07-02T23:47:29+5:30

बळीराजा अडचणीत : सिल्लोड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट

42 thousand farmers, banks for lending, lending | ४२ हजार शेतकरी कर्जासाठी बँका, सावकाराच्या दारी

४२ हजार शेतकरी कर्जासाठी बँका, सावकाराच्या दारी

googlenewsNext
ीराजा अडचणीत : सिल्लोड तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
श्यामकुमार पुरे/ सिल्लोड
मृग नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली. गत १५ दिवसांपासून पावसाने तडी दिल्यामुळे आता उन्हामुळे पिके कोमेजू लागली आहेत.यामुळे दुबार पेरणी करावी लागते की काय, अशी चिंता बळीराजाला लागली आहे़ त्यात कर्ज देणार्‍या बँका शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहेत. कशी तरी उसनवारी करून बी-बियाणे खरेदी करणारे शेतकरी कर्जासाठी बँक तसेच सावकाराचे उंबरठे झिजवीत आहेत़ शेतकर्‍याची अडवणूक करणार्‍या अधिकार्‍यांना वरिष्ठ पातळीवरून शेतकर्‍यांना बँका कर्ज देतेय, मोफत नाही याची जाणीव करून देणे गरजेचे आहे़
सिल्लोड तालुक्यात ७४ हजार शेतकरी आहेत. यापैकी ३२ हजार शेतकर्‍यांना १०० कोटी रुपये पीककर्ज वाटप केले आहे़ सिल्लोड तालुक्यातील काही निवडक बँकांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात वाटप केले आहे़ अजूनही जवळपास ४२ हजार शेतकरी कर्जासाठी बँकांत तसेच सावकारांकडे खेट्या मारत असल्याचे तालुक्यात चित्र आहे़
गेल्या १५ दिवसांपासून पाऊस उघडल्याने जमिनीतून वर उगवून आलेल्या कोवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. लवकरच पावसाचे आगमन झाले नाही तर तालुक्यातील जवळपास ९९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बँकांना शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, यापैकी काही बँकांनी कर्जपुरवठा केला तर काही बँका कासवगतीने काम करून शेतकर्‍यांना आज, उद्या करून वेळ मारून नेताना दिसत आहेत. तसेच काही बँका कर्मचारी संख्या अपुरी असल्याचे कारण पुढे करीत आहेत़ विशेष म्हणजे काही बँकांनी तर गावांचा वार ठरवून दिला आहे़ ठरवून दिलेल्या दिवशीच शेतकर्‍यांनी बँकेत येणे गरजेचे आहे़ नसता बळीराजाला या बँकेत सापत्न वागणूक मिळते़
गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळी स्थितीचा सामना करणारा शेतकरी पार थकला आहे. या शेतकर्‍याच्या निसर्गाकडून अपेक्षा वाढल्या असताना निसर्ग सतत शेतकर्‍याचे कंबरडे मोडत आहे. शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती कमालीची बिघडली आहे. दागदागिने विकून, तर काहींनी जमिनी गहाण ठेवून सावकारांकडून कर्ज घेतले, तर काहींनी उसनवारी करून बी-बियाणे खरेदी करीत पेरणी केली.

Web Title: 42 thousand farmers, banks for lending, lending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.