तुमच्यासाठी काय पण! 42 वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली 22 वर्षीय विद्यार्थिनी अन् झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 03:56 PM2022-02-10T15:56:43+5:302022-02-10T16:02:40+5:30
मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सध्या य़ाच घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली - प्रेमासाठी लोक वाटेल ते करतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक 22 वर्षीय विद्यार्थिनी 42 शिक्षकाच्या प्रेमात पडली आणि पळून गेल्याची घटना घडली आहे. यानंतर दोघांनीही लग्न केलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सध्या य़ाच घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. राजस्थानच्या भरतपूरमध्ये हा प्रकार घडला. शिक्षिकेने विद्यार्थिनीला पळवून नेल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दोघांनीही कोर्टात लग्न केलं. हा शिक्षक घरात ट्यूशन शिकवण्यासाठी येत होता.
कुटुंबीयांना बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली तेव्हा दोघेही एसडीएम समोर हजर झाले. तरुणीने आपल्या इच्छेने लग्न केल्याचं सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावाच्या सरस्वती आयटीआय कॉलेजमध्ये 42 वर्षीय सतवीर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवत होता. मुलीच्या वडिलांनी त्याच्यासोबत संपर्क केला होता. बीएडची तयारी करण्यासाठी सतवीरकडे क्लास लावला होता. सतवीर शिकवण्यासाठी घरी जात होता. साधारण 1 वर्षांनंतर सतवीरने कॉलेजमध्ये शिकवणं बंद केलं.
विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी तो तिच्या घरी जात होता. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. त्यांच्या या प्रेम प्रकरणाची कुटुंबीयांना अजिबात कल्पना नव्हती. विद्यार्थिनी जानेवारीत आपल्या आत्याकडे राहायला गेली होती. तेथे आल्यानंतर दोघांनी पळून जाण्याचा प्लॅन केला. 21 जानेवारी रोजी सतवीर भरतपूर पोहोचला आणि तेथून पळून दोघीही अजमेरला गेले. येथे दोघांनी लग्न केलं. यानंतर आत्याच्या कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र तिच्याबद्दल काहीच कळालं नाही.
मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. विद्यार्थिनीला शिकवत असताना त्याने कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. अनेकदा त्याने कुटुंबाला आर्थिक साहाय्यही केलं होतं. बुधवारी सतवीर आणि तरुणी भरतपूर एसडीएमच्या समोर हजर झाले. दोघांनी पोलिसासमोर जबाब नोंदवला. दोघांनी स्वत:च्या इच्छेने लग्न केल्याचं सांगितलं. यापुढेही एकमेकांसोबत राहायचं असल्याचं दोघांनीही सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.