बिहारमध्ये ४२०५ दारू तस्करांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:19 AM2021-11-17T06:19:20+5:302021-11-17T06:19:51+5:30

एका महिन्यात विषारी दारूमुळे ४८ मृत्यू

4205 drug smugglers arrested in Bihar | बिहारमध्ये ४२०५ दारू तस्करांना अटक

बिहारमध्ये ४२०५ दारू तस्करांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे३ ते १२ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या विशेष छापेमारीत एकूण ३००१ गुन्हे दाखल केले गेले.

पाटणा : बिहारमध्ये विषारी दारू पिण्यात आल्यामुळे गेल्या एक महिन्यात ४८ जणांचा मृत्यू झाल्यामुळे सरकारच्या दारूबंदी कायद्यावरून विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. यापार्श्वभूमीवर कोंडी झालेल्या सरकारच्या संरक्षणासाठी पोलीस कारवाई करीत आहेत. ३००१ गुन्हे दाखल झाले तर दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ४२०५ दारूतस्करांना अटक झालीबेतिया, गोपालगंज, मुजफ्फरपूर, समस्तीपूरसह अनेक जिल्ह्यांत सरकारी कर्मचाऱ्यांसह गावांत सामान्य लोकांची दारू पिल्यानंतर प्रकृती बिघडली व मृत्यू झाले.

३ ते १२ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या विशेष छापेमारीत एकूण ३००१ गुन्हे दाखल केले गेले. दारूबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ४२०५ दारूतस्करांना अटक झाली. ५८०८९ लिटर देशी आणि ५०,४०० लिटर विदेशी दारू जप्त केली गेली. याच कालावधीत १८,५६२ लिटर देशी आणि ५८,८६१ लिटर विदेशी दारू नष्ट केली गेली. ३२९ दुचाकी, १०४ तीन व चारचाकी वाहनांसह अनेक वाहने जप्त झाली.

Web Title: 4205 drug smugglers arrested in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.