अडत्यांशिवाय झाले ४३ लिलाव शेतकर्‍यांना बाजार समितीचे सहकार्य : अडत असोसिएशन बेमुदत संपावर ठाम

By admin | Published: July 12, 2016 12:07 AM2016-07-12T00:07:56+5:302016-07-12T00:07:56+5:30

जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट बंद करण्यासाठी सोमवारी अडतदारांनी बंद पुकारला, परंतु बाजार समितीमधील प्रशासन, संचालक यांनी सहकार्य करून बाजार समितीमध्ये आलेला भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे सोमवारी अडतदारांचा बंद असूनही फळ व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी ४३ लिलाव झाले.

43 associations with the support of market committee: Aadhaar Association stays free from indefinite strike | अडत्यांशिवाय झाले ४३ लिलाव शेतकर्‍यांना बाजार समितीचे सहकार्य : अडत असोसिएशन बेमुदत संपावर ठाम

अडत्यांशिवाय झाले ४३ लिलाव शेतकर्‍यांना बाजार समितीचे सहकार्य : अडत असोसिएशन बेमुदत संपावर ठाम

Next
गाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट बंद करण्यासाठी सोमवारी अडतदारांनी बंद पुकारला, परंतु बाजार समितीमधील प्रशासन, संचालक यांनी सहकार्य करून बाजार समितीमध्ये आलेला भाजीपाला विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली. यामुळे सोमवारी अडतदारांचा बंद असूनही फळ व भाजीपाला मार्केटमध्ये सकाळी ४३ लिलाव झाले.
हे लिलाव शेतकर्‍यांकडून कुठलेही शुल्क, कर न आकारता झाले. अडतदारांनी आणखी बंद सुरूच ठेवला तरी बाजार समितीमध्ये अडतदारांशिवाय लिलाव करण्यास बाजार समिती सहकार्य करणार असून, जागाही नि:शुल्क उपलब्ध करून दिली जाईल. फळ व भाजीपाला मार्केटमध्ये शेतकरी व ग्राहकांनी भाजीपाला, फळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी यावे, असे सभापती प्रकाश नारखेडे यांनी म्हटले आहे.

बंद सुरू ठेवू
खुला बाजार व्यवस्थेला विरोध करण्यासाठी बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट अडत असोसिएशनने हा बंद किंवा संप पुढेही सुरू ठेवला जाईल, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे हा बंद किती दिवस सुरू राहील हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

अडतदारांशिवाय लिलाव करण्यास मुभा
फळ व भीजापाला मार्केटमध्ये अडतदारांनी बंद पुकारला असला तरी जे शेतकरी या मार्केटमध्ये आपला भाजीपाला विक्रीसाठी आणतील त्यांना प्रवेश दिला जाईल. तसेच ग्राहकांना थेट शेतकर्‍यांकडून भाजीपाला खरेदी करता येईल. अडतदारांशिवाय लिलाव करता येतील. फक्त खरेदीदारांना ठरलेले शुल्क भरावे लागेल, असे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे.

शेतकरी हित जोपासू
अडतदारांनी बंद पुकारलेला असला तरी शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी आहे. फळ व भाजीपाला मार्केट, धान्य मार्केटमध्ये शेतमालाचे लिलाव नियमीत होतील. गरज पडली तर पोलीस कुमक मागवून कार्यवाही करू. शेतकरी हित जोपासण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे सभापती प्रकाश नारखेडे यांनी सांगितले.

संपात हमाल सहभागी नाहीत
बाजार समितीमधील संप किंवा बंदमध्ये हमाल, माथाडी, मापाडी कामगारांचा सहभाग नाही. धान्य मार्केट नियमीतपणे सुरू असल्याचे कामगार संघटनेेने म्हटले आहे.

थेट विक्रीसाठी यंत्रणा उभारा
शासनाने शेतमाल थेट ग्राहकाला विक्री करण्यासाठी कायदा केला, निर्णय घेतले, परंतु अडतदार हे असहकार्य करीत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. अडतमुक्त बाजारपेठ उपलब्ध करून द्या. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी जागा द्या. त्याचा प्रचार करावा, असे भाजीपाला उत्पादक दिनकर भंगाळे म्हणाले.

Web Title: 43 associations with the support of market committee: Aadhaar Association stays free from indefinite strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.