एका आदेशान्वये ४३ खटले रद्द

By admin | Published: June 25, 2016 03:09 AM2016-06-25T03:09:59+5:302016-06-25T03:09:59+5:30

एका कौटुंबिक न्यायालयाने दहा ओळींचा आदेश जारी करून वैवाहिक प्रकरणांशी संबंधित असलेले ४३ खटले फेटाळल्यामुळे घटस्फोट, पोटगी आणि बाल संगोपन या क्षेत्रातील तज्ज्ञ वकिलांच्या भुवया उंचावल्या आहेत

43 cases rejected under one order | एका आदेशान्वये ४३ खटले रद्द

एका आदेशान्वये ४३ खटले रद्द

Next

चेन्नई : एका कौटुंबिक न्यायालयाने दहा ओळींचा आदेश जारी करून वैवाहिक प्रकरणांशी संबंधित असलेले ४३ खटले फेटाळल्यामुळे घटस्फोट, पोटगी आणि बाल संगोपन या क्षेत्रातील तज्ज्ञ वकिलांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वैवाहिक जीवनात मतभेद असलेल्या आणि न्यायालयाबाहेर समझोता करू इच्छिणाऱ्या ४३ जोडप्यांनी सोमवारी चेन्नईतील कौटुंबिक न्यायालयात एक संयुक्त याचिका दाखल केली होती. आपले प्रकरण बंद करण्यात यावे, अशी विनंती परस्पर सहमतीने न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या या जोडप्यांनी केली होती. यातील काही खटले सात वर्षे जुने होते. ‘कदाचित न्यायालयाच्या पायऱ्या झिजविण्यात काही अर्थ नाही, याची जाणीव त्यांना झाली असावी. त्यामुळे त्यांनी खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला असावा,’ असे अ‍ॅड. आर. सुधा म्हणाल्या. न्यायालयाने बुधवारी या सर्व ४३ मूळ याचिका सुनावणीसाठी घेतल्या. जोडप्यांनी दाखल केलेले समझोत्याचे निवेदन कायद्याला धरून नाही आणि त्यामुळे ते फेटाळण्यात येत असल्याचा आदेश त्यांनी न्यायाधीशाने दिला. (वृत्तसंस्था)

Web Title: 43 cases rejected under one order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.