४४% भारतीयांना नोकरीची चिंता!; १७ लाख नवीन बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 01:35 AM2018-10-13T01:35:06+5:302018-10-13T01:36:01+5:30

दरवर्षी २ कोटी रोजगारांचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र, तेवढ्या नोकऱ्या देशात तयार झालेल्या नाहीत. त्याउलट ४४ टक्के भारतीयांना नोकरीची चिंता आहे. ‘आयपीएसओएस’ संस्थेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

44% of Indians worry about job! 17 lakh new unemployed | ४४% भारतीयांना नोकरीची चिंता!; १७ लाख नवीन बेरोजगार

४४% भारतीयांना नोकरीची चिंता!; १७ लाख नवीन बेरोजगार

Next

मुंबई : दरवर्षी २ कोटी रोजगारांचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र, तेवढ्या नोकऱ्या देशात तयार झालेल्या नाहीत. त्याउलट ४४ टक्के भारतीयांना नोकरीची चिंता आहे. ‘आयपीएसओएस’ संस्थेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
संस्थेच्या अहवालानुसार, दरवर्षी लाखो नवीन नोकºया तयार होत असल्याचे बोलले जात आहे. तसे असले, तरी वास्तवात बेरोजगारी अधिक प्रमाणात वाढत आहे. देशातील नोकºया निर्मितीचा नेमका सर्वसमावेशक आकडा काढणे अशक्य आहे, पण स्थिर किंवा समाधानकारक नोकरीबाबत देशातील युवकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे, हे नक्की. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेनुसार (ईपीएफओ) आॅगस्ट महिन्यात देशात ९ लाख ५१ हजार नवीन नोकºया तयार झाल्या. रोजगारनिर्मितीचा हा ११ महिन्यांचा उच्चांक होता. यामुळे सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ दरम्यान देशातील नवीन नोकºयांचा आकडा ६१ लाख ८१ हजारावर गेला.
दुसरीकडे, भारतीय अर्थव्यवस्था निरीक्षण केंद्राने (सीएमआयई) मात्र नोव्हेंबर
२०१७ पासून देशातील नोकºयांचे प्रमाण सातत्याने कमी होत असल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ दरम्यान जवळपास १७ लाख नवीन बेरोजगार तयार झाले आहेत, असा दावा सीएमआयईने केला आहे.

प्रमाण १ टक्काच
अझीझ प्रेमजी विद्यापीठाचा अहवालसुद्धा नोकºयांसंबंधी निरुत्साह दर्शविणारा आहे. मागील काही वर्षांत आर्थिक विकास दर ६ ते ७ टक्के आहे, पण त्या तुलनेत दरवर्षी तयार होणाºया नवीन नोकºयांचे प्रमाण १ टक्का आहे, असे विद्यापीठाने अहवालात नमूद केले आहे. देशात नेमक्या किती नोकºया तयार झाल्या, याबाबत संभ्रम आहे, पण विविध अभ्यास अहवालांनुसार रोजगाराचे चित्र फारसे समाधानकारक नाही, हे स्पष्ट होत आहे.

Web Title: 44% of Indians worry about job! 17 lakh new unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी