Supreme Court : सर्वाेच्च न्यायालयातील ४४ कर्मचारी पॉझिटिव्ह, न्यायाधीशांचे ‘वर्क फ्राॅम हाेम’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 04:54 AM2021-04-13T04:54:37+5:302021-04-13T06:56:53+5:30
Supreme Court : ९० पैकी ४४ कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी घरातूनच व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीचा पर्याय निवडा. कर्मचाऱ्यांना काेराेना झाल्याचे कळताच न्यायालयातील परिसर सॅनिटाइझ करण्यात आला.
नवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या संसर्गाने सर्वाेच्च न्यायालयाला विळखा घातला आहे. न्यायालयातील अर्धे कर्मचाऱ्यांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी ‘वर्क फ्राॅम हाेम’चा पर्याय निवडून घरूनच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
९० पैकी ४४ कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी घरातूनच व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीचा पर्याय निवडा. कर्मचाऱ्यांना काेराेना झाल्याचे कळताच न्यायालयातील परिसर सॅनिटाइझ करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाचे काम एक तास उशिरा सुरू झाले. न्यायाधीशांनी वर्क फ्राॅम हाेमचा पर्याय निवडला. न्यायालयाच्या कामकाजावर काेणताही परिणाम हाेणार नाही. व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या १६०० लिंक न्यायालयाकडे उपलब्ध
आहेत. त्या माध्यमातून १६ खंडपीठांचे काम सुरू आहे. इलेक्ट्राॅनिक स्वरूपात फाइल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे फाइल्स प्रत्यक्ष हलविण्याची गरज नाही, असे न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.
३ न्यायाधीशांना काेराेना
दिल्ली उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनाही काेराेना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज आता २३ एप्रिलपर्यंत व्हीडिओ काॅन्फरन्सद्वारे हाेणार आहे. चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी साेमवारी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही. त्यांना त्यांच्या निवासस्थानी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.