कृषीपंपधारकांवर ४४१ कोटीची थकबाकी

By admin | Published: February 22, 2016 12:03 AM2016-02-22T00:03:17+5:302016-02-22T00:03:17+5:30

जळगाव : महाराष्ट्र शासन पुरस्कृत कृषी संजीवनी योजनेचे लाभ घेणारे जळगाव परिमंडळातील ३ लाख २० हजार ४७६ कृषीपंपधारकांकडे सुमारे ४४१ कोटीची थकबाकी आहे.

441 crores outstanding for agricultural pumps | कृषीपंपधारकांवर ४४१ कोटीची थकबाकी

कृषीपंपधारकांवर ४४१ कोटीची थकबाकी

Next
गाव : महाराष्ट्र शासन पुरस्कृत कृषी संजीवनी योजनेचे लाभ घेणारे जळगाव परिमंडळातील ३ लाख २० हजार ४७६ कृषीपंपधारकांकडे सुमारे ४४१ कोटीची थकबाकी आहे.
या योजनेत आतापर्यंत तब्बल ८५ हजाराच्यावर शेतकर्‍यांनी १३६ कोटीच्यावर थकबाकी भरली असून उर्वरित थकबाकीदारांसाठी ३१ मार्च २०१६ पर्यंत भरणा करण्यासाठी महावितरणाकडून मुदत देण्यात आली आहे.
या योजनेतील कृषीपंपधारकांची थकीत मुळ रक्कमेच्या ५० टक्के रक्कम राज्य शासनाकडून महावितरणाला अनुदान स्वरूपात देण्यात येईल, तर ३१ मार्च २०१४ पर्यंत थकीत असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरण कडून माफ करण्यात येणार आहे.
तसेच या कृषीपंपधारकांना ५० टक्के मुळ थकबाकीचा भरणा केल्यानंतर १ एप्रिल २०१४ नंतरच्या सर्व चालू वीज देयकांचा पूर्णपणे व नियमित भरणा करणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

पाणी पुरवठा संजिवनी योजनेची १६६ कोटी थकबाकी
राज्यातील दुष्काळग्रस्त गावांकरीता सुरू करण्यात आलेल्या पाणी पुरवठा संजीवनी योजनेचे जळगाव परिमंडळात १६६ कोटीच्या वर थकबाकी असल्याचे चित्र आहे. त्यात ग्रामीण भागातील पाणी पुरवठा म्हणजेच ग्रामपंचायत, नगरपालिका व इतर ग्राहकांवर ही थकबाकी आहे.

Web Title: 441 crores outstanding for agricultural pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.