हृदयद्रावक! बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 45हून अधिक लोकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2018 10:52 AM2018-07-01T10:52:09+5:302018-07-01T12:25:37+5:30
उत्तराखंडच्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भोन मार्गावर एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 40हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
कोटद्वार- उत्तराखंडच्या पौडी गढवाल इथल्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावर एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 45हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी खचाखच भरलेली बस भौनहून रामनगरला जात होती. नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावरच्या ग्वीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस दरीत जाऊन कोसळली.
या भीषण अपघातात 45हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. बस 28 आसनी असून, रस्तावरून जवळपास 60 मीटर खाली कोसळली. जिल्हा आपत्कालीन विभागानं या दुर्घटनेत 45 लोकांचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती दिली आहे. बस दरीत कोसळल्यानंतर एका झाडाला लटकली. त्यामुळे मोठा अपघात होता होता टळला. ही घटना काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यानची आहे.
नैनितालपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर हलद्वानी मार्गावर बस दुर्घटनाग्रस्त होऊन 20 मीटर खोल दरीत कोसळली. परंतु एका झाडामुळे बस दरीत कोसळल्यानंतर झाडाला लटकली. त्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. काहींनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तर बसमधील सर्वच प्रवाशांचा जीव धोक्यात होता. मदतीसाठी ते जोरजोरात ओरडत होते. या दुर्घटनेतून बसमधील 35 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
20 bodies have been recovered, 12 injured referred to hospital after a bus fell down a gorge in Pauri Garhwal district's Nanidhanda area. Number of casualties expected to rise: Garhwal Commissioner Dilip Jawalkar #Uttarakhandpic.twitter.com/YIskUa0Ku8
— ANI (@ANI) July 1, 2018