४५० कोटींचा लॉजिस्टिक पार्क जालन्यात, मराठवाड्याच्या विकासाला चालना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 11:00 AM2022-09-22T11:00:01+5:302022-09-22T11:00:28+5:30
यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली/ जालना : मराठवाड्याच्या विकासाला चालना देणाऱ्या भारतमाला योजनेअंतर्गत मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी) जालना जिल्ह्यात दरेगाव आणि जवसगाव शिवारात १८२ हेक्टरमध्ये विकसित केला जाणार आहे. यावर ४५० कोटी खर्च होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (एनएचएलएमएल) व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला.
यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी मान्यवर उपस्थित होते. विकासाला गती मिळण्यासह रोजगार क्षमतेत वाढ व्हावी म्हणून याआधी जालना जिल्ह्यात दरेगाव आणि जवसगाव शिवारात ड्रायपोर्टची उभारणी झाली व आता त्याला लागूनच लॉजिस्टिक पार्कची उभारणी होणार आहे. यावर्षीच्या डिसेंबरमध्ये ड्रायपोर्ट येथून मालाची वाहतूक ही जेएनपीटीच्या मुंबईतील बंदरापर्यंत सुरू होईल.