निवडणुकीत ४५० जण कोट्यधीश; १० % उमेदवारांवर गंभीर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 06:19 AM2024-04-09T06:19:17+5:302024-04-09T06:19:47+5:30

पहिल्या टप्प्यात १,६२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; ४ काेटीपेक्षा जास्त सरासरी संपत्ती; १० जणांकडे शून्य मालमत्ता

450 millionaires; Serious offenses against 10% candidates | निवडणुकीत ४५० जण कोट्यधीश; १० % उमेदवारांवर गंभीर गुन्हे

निवडणुकीत ४५० जण कोट्यधीश; १० % उमेदवारांवर गंभीर गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात २१ राज्यांतील १०२ जागांसाठी एकूण १,६२५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी १,६१८ उमेदवारांच्या निवडणूक अर्जांचा अभ्यास केला असता, त्यापैकी १६ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर १० टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले आहे.

या टप्प्यातील उमेदवारांपैकी जवळपास ४५० (२८ टक्के) उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यापैकी सर्वाधिक तामिळनाडूत २०२, राजस्थानमध्ये ३७, तर महाराष्ट्रात ३६ उमेदवार कोट्यधीश आहेत. उमेदवारांची सरासरी संपत्ती ही ४.५१ कोटी आहे. 

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार
रिंगणातील एकूण उमेदवार    १,६१८ 
गुन्हे दाखल असलेले उमेदवार    २५२ 
गंभीर गुन्हे दाखल    १६१ 
द्वेषपूर्ण विधान केल्याचे गुन्हे दाखल    ३५ 
खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल    १९ 
महिलांशी संबंधित गुन्हे दाखल    १८ 
गुन्ह्यात दोषी घोषित केलेले    १५ 
खुनाच्या प्रकरणात अडकलेले    ७

टॉप ३ श्रीमंत उमेदवार
नाव    मतदारसंघ (राज्य)    पक्ष    एकूण संपत्ती
नकुल नाथ    छिंदवाडा (मध्य प्रदेश)    काँग्रेस    ७१६.९४ कोटी
अशोक कुमार    इरोड (तामिळनाडू)    अद्रमुक    ६६२.४६ कोटी
देवनाथन यादव    शिवगंगा (तामिळनाडू)    भाजप    ३०४.९२ कोटी

प्रमुख पक्षांतील कोट्यधीश उमेदवार

राजद    ४
अद्रमुक    ३५ 
द्रमुक    २१ 
भाजप    ६९ 
काँग्रेस    ४९ 
तृणमूल    ४
बसपा    १८

२८ टक्के उमेदवार कोट्यधीश 
संपत्ती    एकूण उमेदवार    टक्के 
५ कोटी    १९३    १२% 
२-५ कोटी    १३९    ९% 
५० लाख-२ कोटी    २७७    १७% 
१० लाख-५० लाख    ४३६    २७% 
१० लाखांपेक्षा कमी    ५७३    ३५% 

४२ मतदारसंघ रेड अलर्टमध्ये 
पहिल्या टप्प्यातील १०२ पैकी ४२ मतदारसंघ रेड अलर्ट आहेत. रेड अलर्ट मतदारसंघ म्हणजे एका मतदारसंघात तीनपेक्षा अधिक उमेदवारांनी त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल केल्याचे मान्य करणे होय.

प्रमुख पक्षांतील गुन्हेगार उमेदवार
पक्ष    एकूण     गुन्हे    गंभीर 
    उमेदवार    जाहीर    गुन्हे
राजद    ४    ४ (१००%)    २ (५०%) 
द्रमुक    २२    १३ (५९%)    ६ (२७%) 
सपा    ७    ३ (४३%)    २ (२९%)
तृणमूल    ५    २ (४०%)    १ (२०%) 
भाजप    ७७    २८ (३६%)    १४ (१८%) 
अद्रमुक    ३६    १३ (३६%)    ६ (१७%) 
काँग्रेस    ५६    १९ (३४%)    ८ (१४%)
बसपा    ८६    ११ (१३%)    ८ (९%)

८३६ (५२%) 
उमेदवार पदवीधर.
६३९ (३९%) 
उमेदवार हे ५वी ते १२वी शिकलेले आहेत.
८४९ (५२%) 
उमेदवार ४१ ते ६० वयोगटातील
५०५ (३१%) 
उमेदवार २५ ते ४० वयोगटातील
२६० (१६%) 
उमेदवार ६१ ते ८० वयोगटातील
 

Web Title: 450 millionaires; Serious offenses against 10% candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.