600 स्क्वेअर फुटच्या घरासाठी 4.53 कोटी प्रॉपर्टी टॅक्स
By admin | Published: May 29, 2017 02:26 PM2017-05-29T14:26:01+5:302017-05-29T14:59:46+5:30
500 ते 600 स्क्वेअर फूटच्या मालमत्तेवर चार ते पाच हजारांचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्यास सांगितला तर, कोणाला आक्षेप वाटणार नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 29 - 500 ते 600 स्क्वेअर फूटच्या मालमत्तेवर चार ते पाच हजारांचा प्रॉपर्टी टॅक्स भरण्यास सांगितला तर, कोणाला आक्षेप वाटणार नाही. पण 600 स्क्वेअर फुटच्या घरासाठी 4.53 कोटी प्रॉपर्टी टॅक्स भरायला सांगितला तर ? बंगळुरु महापालिकेने ही करामत केली असून, कावेरी नगर येथे राहणा-या अस्लम पाशा यांना तब्बल 4.53 कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरायला सांगितला आहे. अस्लम पाशा यांना त्यांच्या 600 स्क्वेअर फुटच्या एकमजली घरासाठी इतका प्रॉपर्टी टॅक्स भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
अस्लम यांनी अद्याप ते चालान बघितले नसून, ते कर भरण्यासाठी बीबीएमपीच्या महसूल कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांना सोमवारी परत येण्यास सांगितले. तांत्रिक बिघाडामुळे अस्लम शेख यांच्याबाबतीत ही समस्या उदभवली आहे. पाच टक्के सवलत मिळवण्यासाठी प्रॉपर्टीचे मालक 31 मे पूर्वी सर्व टॅक्स भरण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या सॉफ्टवेअरमधल्या बिघाडाचा फटका त्यांना सहन करावा लागत आहे.
दुस-या एका प्रकरणात दक्षिण बंगळुरुमध्ये राहणारे बीएम श्रीनिवास मुर्ती यांना 1.59 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी टॅक्सची नोटीस पाठवण्यात आली. त्यांनी त्यांच्या दोन मजली मालमत्तेसाठी 6,235 रुपये प्रॉपर्टी टॅक्स मागच्यावर्षी भरला होता. 22 मे रोजी नोटीस मुर्ती यांच्या हातात पडली. त्यांनाही अजून टॅक्स भरायचा आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उदभवल्याचे येदीयुरचे माजी नगरसेवक एन.आर.रमेश यांनी सांगितले. अनेक प्रॉपर्टी मालकांना उलट सुलट चालान आले आहे. आमची चूक झाली असून, आम्ही लवकरच चूक सुधारी असे सहाय्यक आयुक्तांनी सांगितले.