आंध प्रदेशातील पशु संरक्षण केंद्रातील 46 गायींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 09:08 PM2017-07-22T21:08:36+5:302017-07-22T21:08:36+5:30
न्यूमोनिया व कथित स्वरुपात चा-याअभावी आंध प्रदेशातील पशु संरक्षण केंद्रातील तब्बल 46 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
काकिनाडा (आंध्र प्रदेश), दि. 22 - न्यूमोनिया व कथित स्वरुपात चा-याअभावी येथील पशु संरक्षण केंद्रातील तब्बल 46 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पशु केंद्राच्या क्षमतेपेक्षा अधिक गुरांना ठेवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. आंध्र प्रदेश सरकारमधील अधिका-यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
गोदावरी जिल्ह्यातील अधिका-यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी केंद्राच्या व्यवस्थापकीय अधिका-याविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पशु केंद्रात चिखल साचला होता.
पुढे ते असेही म्हणाले की, शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे सोसायटी फॉर प्रीव्हेन्शन ऑफ क्रूअॅलिटी टू एनिमल्सद्वारे (एसपीसीए) चालवण्यात येणारे या पशु केंद्रात चिखल साचला व त्यानंतर दुर्गंधी पसरली. दरम्यान, एसपीसीएकडून आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत.
आणखी बातम्या वाचा
पशु पालन विभागाच्या संयुक्त संचालकांनी सांगितले की, प्रचंड पाऊस व चिखलामुळे गायींना न्यूमोनिया झाला व त्या मृत्यूमुखी पडल्या. तर यातील काही गायी चा-याअभावी मृत्यूमुखी पडल्या आहेत. आम्ही केंद्रातील अन्य गुरांवर उपचार करण्यासाठी विशेष शिबिर सुरू केले असून आता येथील परिस्थिती नियंत्रणात आहे.
अधिका-यांनी असाही आरोप केला आहे की, पुश केंद्रामध्ये 150 गुरे ठेवण्याची क्षमता असताना 480 गुरांना ठेवण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय एक चौकशी समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे.