सफाई कर्मचाऱ्यांची भरती, इंजिनीअर अन् MBA डिग्रीवाल्यांनी केला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 09:26 AM2019-02-06T09:26:07+5:302019-02-06T09:27:45+5:30
देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
चेन्नई- देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या बेरोजगारीमुळे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तामिळनाडूमध्ये सफाई कर्मचारी आणि सॅनेटरी कामगारांच्या पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. तामिळनाडू विधानसभा सचिवालयात सफाई कर्मचारी आणि सॅनेटरी वर्कर्ससाठी जवळपास 14 जागा काढण्यात आल्या होत्या. या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये एमटेक, बीटेक, एमबीए आणि पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधारकांबरोबरच योग्यता असलेल्या इतर उमेदवारांचाही समावेश आहे.
तसेच डिप्लोमा केलेल्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी 10 आणि सॅनेटरी वर्कर्सच्या 4 पदांसाठी अर्ज केला आहे. 26 सप्टेंबर 2018ला तामिळनाडू विधानसभा सचिवालयानं रिक्त जागांसाठी जाहिरात दिली होती. उमेदवार सक्षम असण्याबरोबरच त्या पदासाठी योग्य असावा, अशी अट त्या जाहिरातीत घालण्यात आली होती.
तसेच या पदांसाठी अर्जदारांचं कमीत कमी वय 18 वर्षं ठेवण्यात आलं आहे. या 14 पदांसाठी जवळपास इंजिनीअर आणि एमबीए डिग्री घेतलेल्या 4607 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 677 अर्ज अपात्र ठरवण्यात आलं आहेत. त्यानंतर आता त्या पदांसाठी मापदंडांतून भरती करण्यात येणार आहे.