४७ पोलाद उत्पादनांवर आयातविरोधी शुल्क
By admin | Published: May 13, 2017 12:11 AM2017-05-13T00:11:28+5:302017-05-13T00:11:28+5:30
पोलादाची स्वस्त आयात रोखण्यासाठी भारत सरकारने अर्धा डझन देशांतील ४७ पोलाद उत्पादनांवर पाच वर्षांसाठी स्वस्त आयातविरोधी शुल्क लावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पोलादाची स्वस्त आयात रोखण्यासाठी भारत सरकारने अर्धा डझन देशांतील ४७ पोलाद उत्पादनांवर पाच वर्षांसाठी स्वस्त आयातविरोधी शुल्क लावले आहे. या देशांत चीन, जपान, दक्षिण कोरिया, रशिया, ब्राझील आणि इंडोनेशिया यांचा समावेश आहे.
स्वस्त आयातीपासून देशांतर्गत पोलाद उत्पादकांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शुल्क लादलेल्या उत्पादनांत हॉट-रोल्ड फ्लॅट उत्पादने आणि झिंकचा मुलामा असलेली, तसेच क्लॅड स्टील उत्पादनांचा समावेश आहे.
अधिकृतरीत्या जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ८ आॅगस्ट २0१६ पासून पुढे पाच वर्षांसाठी हे शुल्क अमलात राहील. प्रतिटन ४७८ ते ५६१ डॉलर यादरम्यान हे शुल्क राहील.