४७ वर्षांनंतर मिळाले सनदी अधिकाऱ्याला मिळाले सुवर्ण पदक
By admin | Published: June 25, 2016 03:10 AM2016-06-25T03:10:49+5:302016-06-25T03:10:49+5:30
पाच दशकांच्या संघर्षानंतर ८१ वर्षीय निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला राजस्थानच्या विद्यापीठाकडून सुवर्ण पदक मिळविण्यात यश आले आहे.
जयपूर : पाच दशकांच्या संघर्षानंतर ८१ वर्षीय निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला राजस्थानच्या विद्यापीठाकडून सुवर्ण पदक मिळविण्यात यश आले आहे. अजितसिंग सिंघवी असे या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे. १९६९ मध्ये अजितसिंग यांनी एलएलबी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली होती. विद्यापीठाने त्यांचा गुरुवारी सुवर्ण पदक प्रदान करून गौरव केला.
कुलगुरू जे. पी. सिंघल यांनी अजितसिंग यांना सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र प्रदान केले. सर्वाधिक गुण मिळवूनही त्यांना सुवर्ण पदक देण्यात आले नव्हते. त्यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. अखेर ४७ वर्षांनंतर त्यांना न्याय मिळाला आणि न्यायालयाने त्यांना सुवर्ण पदक देण्याचा आदेश विद्यापीठाला दिला. (वृत्तसंस्था)