गुजरातमध्ये पावसाचे ४९ बळी; ३७ हजार लोकांची सुटका; सुरतमध्ये पूरस्थिती कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:27 PM2024-09-05T13:27:30+5:302024-09-05T13:28:00+5:30

Gujarat Flood: ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला.  विविध भागांत पूर आल्याने एनडीआरएफ आणि लष्करासह विविध यंत्रणांनी ३७ हजारहून अधिक लोकांना वाचवले.

49 victims of rain in Gujarat; Rescue of 37 thousand people; Flood situation continues in Surat  | गुजरातमध्ये पावसाचे ४९ बळी; ३७ हजार लोकांची सुटका; सुरतमध्ये पूरस्थिती कायम 

गुजरातमध्ये पावसाचे ४९ बळी; ३७ हजार लोकांची सुटका; सुरतमध्ये पूरस्थिती कायम 

अहमदाबाद - ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला.  विविध भागांत पूर आल्याने एनडीआरएफ आणि लष्करासह विविध यंत्रणांनी ३७ हजारहून अधिक लोकांना वाचवले. दरम्यान, देशातील १९ राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. गुजरातमधील महिसागर जिल्ह्यातील जवळपास १०६ गावांना पुराचा इशारा दिला आहे.

देशात कुठे काय घडले?
- गुजरातसोबत बिहार, मध्य प्रदेश व राजस्थानात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. राजस्थानच्या जोधपूर, उदयपूर, भीलवाडा, माडमेर या शहरांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
_आंध्र प्रदेश, तेलंगणा व त्रिपुरात पावसाशी निगडित घटनांमुळे गत ७ दिवसांमध्ये ६४ लोकांचा मृत्यू झाला. नागलँडमध्येही पूरस्थिती आहे.

कलाकारांचे योगदान
तेलगू चित्रपट उद्योगातील अनेक अभिनेते पूरग्रस्तांच्या  मदतीला धावून आले आहेत. चिरंजीवी, अल्लू अर्जुन व महेश बाबू या तिघांनी दोन्ही राज्यांना पूर मदत कार्यात हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत केली. 
या तिघांनी दोन्ही आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत केली आहे.

पूर का आला?
अहमदाबाद : मोठ्या प्रमाणावर होत असलेला  शहरी विकास हा गुजरातमधील पूरपरिस्थितीला कारणीभूत असल्याचा दावा भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगरच्या (आयआयटी - जीएन) संशोधकांनी केला आहे. शहरीकरणासोबत सांडपाण्याची विल्हेवाट न लावता आल्यामुळे हे संकट उद्भवल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.

 

Web Title: 49 victims of rain in Gujarat; Rescue of 37 thousand people; Flood situation continues in Surat 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.