जम्मू-काश्मीरमध्ये भूगर्भात सापडला ५.९ मिलियन टन लिथियमचा साठा, मोबाइल-लॅपटॉपच्या बॅटरी बनवण्यासाठी उपयोगी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:50 AM2023-02-10T10:50:10+5:302023-02-10T10:50:36+5:30
देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा मोठा साठा आढळून आला आहे. लिथियमचा साठा आढळून आलेली हा पहिलाच प्रदेश आहे
देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा मोठा साठा आढळून आला आहे. लिथियमचा साठा आढळून आलेली हा पहिलाच प्रदेश आहे आणि भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणनं (GSI) रियासी जिल्ह्यात पुष्टी केली आहे. इलेक्ट्रिक वाहनं आणि मोबाइल फोनसारख्या उपकरांमध्ये जी बॅटरी वापरील जाते यात लिथियमचा वापर केला जातो. सध्या भारताला लिथियम इतर देशांकडून आयात करावं लागतं. जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात आढळलेल्या साठ्यामुळे आता देशाचे आयातीवरील अवलंबीत्व कमी होणार आहे.
६२ व्या केंद्रीय भूगर्भीय वैज्ञानिक प्रोग्राम बोर्डाच्या (CGPB) बैठकीवेळी लिथियम आणि सोन्यासह ५१ खनिज ब्लॉक्सचा एक रिपोर्ट राज्य सरकारांना सुपूर्द करण्यात आला आहे.
११ राज्यांत आढळून आली खनिज संपत्ती
"५१ खनिज ब्लॉक्सपैकी ५ ब्लॉक्स सोन्याशी संबंधित आहेत. याशिवाय पोटॅशियम, मोलिब्डेनम, बेस मेटलशी निगडीत खनिज संपत्ती आढळून आली आहे. ही खनिज संपत्ती ११ राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात आढळून आली आहे. या राज्यांमध्ये जम्मू-काश्मीर (यूटी), आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामीळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे", अशी माहिती खणीकर्म मंत्रालयानं दिली आहे.