झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ५ जवान जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2016 08:04 PM2016-04-02T20:04:48+5:302016-04-02T20:04:48+5:30

दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 5 जवान जखमी झाले आहेत

5 CRPF personnel injured in Naxal attack in Jharkhand | झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ५ जवान जखमी

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ५ जवान जखमी

Next
ऑनलाइन लोकमत - 
झारखंड, दि. २ - नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवत पुन्हा एकदा सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 5 जवान जखमी झाले आहेत. 30 मार्चला नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये केलेल्या भुसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे 7 जवान शहीद झाले होते
 
सीआरपीएफ जवान पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. चितपूर गावात 12.15 वाजता हल्ला करण्यात आल्याची माहिती बोकारो रेंजचे डीआयजी उपेंद्र कुमार सिंग यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर जवानांसोबत पेट्रोलिंगवर असणा-या पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकदेखील झाली असल्याचं उपेंद्र कुमार सिंग यांनी सांगितलं आहे. सर्व जखमी जवानांना विमानाच्या सहाय्याने रांचीला नेण्यात आलं आहे. रांचीमधील रुग्णालयात जखमी जवानांना भर्ती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 

Web Title: 5 CRPF personnel injured in Naxal attack in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.