वीजेचा धक्का लागून ५ जणांचा दुदैवी मृत्यू, अनेकजण जखमी; उत्तर प्रदेशमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 08:27 AM2023-07-16T08:27:55+5:302023-07-16T08:29:38+5:30
मिळालेल्या माहितीनूसार, शनिवारी रात्री मेरठच्या राली चौहान गावात लोक कावड यात्रा घेऊन पोहचले होते.
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमधील मेरठ गावात वीजेचा धक्का लागून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनूसार, शनिवारी रात्री मेरठच्या राली चौहान गावात लोक कावड यात्रा घेऊन पोहचले होते. डीजेच्या मोठ्या आवाजासह कावड यात्रा गावात दाखल होताच रस्त्याच्याकडेला टांगलेल्या हाय टेंशन लाइन डीजेला धडकली आणि डीजे आणि विद्युत प्रवाह वाहू लागला. कोणाला काही समजण्याआधीच यात्रामधील लोक एकामागून एक वेदनेने जमीनीवर कोसळू लागले. सगळीकडे आरडाओरडा झाला. कोणीतरी पॉवर हाऊसला फोन करून बंद करण्याची विनंती केली पण कोणी ऐकली नाही. मग स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन यात्रेतील अनेक लाोकांना वीज प्रवाहातून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक कावड यात्री जखमी असल्याची माहिती समोर आली.
5 Kanwariyas electrocuted to death, 5 others injured in UP's Meerut village
— ANI Digital (@ani_digital) July 15, 2023
Read @ANI Story | https://t.co/NUttoIaVIL#Kanwariya#UttarPradesh#Meerutpic.twitter.com/8enSeCOZOw
गंगानगर येथील आयआयएमटी रुग्णालयात पोहोचलेल्या मनीषचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान चार कवाड यात्रींचा मृत्यू झाला, त्यापैकी दोन सख्खे भाऊ होते. एडीजी राजीव सभरवाल, डीएम दीपक मीना आणि एसएसपी रोहित सिंह सजवान हेही जखमींना पाहण्यासाठी पोहोचले. दुसरीकडे वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावाबाहेरचा रस्ता रोको करून मेरठ-फोर्ट रस्ता रोखून धरला होता.