अयोध्येत श्रीराम लाट! पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले,गर्दीमुळे वाहनांना बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:53 AM2024-01-24T07:53:49+5:302024-01-24T07:54:07+5:30
सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला.
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर काल म्हणजेच मंगळवारी पहिल्याच दिवशी नवं रेकॉर्ड बनले आहे. पहिल्याच दिवशीच मंदिरात ५ लाख भविकांनी दर्शन घेतले. अयोध्येत वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे, यामुळे प्रशासनाने शहरात वाहनांनवर बंदीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
रामललाच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे, यामुळे प्रशासनाला सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याची गरज होती. यादरम्यान काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.अशा परिस्थितीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वप्रथम लखनौ येथूनच लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला.
मस्तकावर हिरे-माणकांचा टिळा, भव्य, दिव्य आणि अलौकिक आहे रामललांचा श्रृंगार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आढावा घेतला
उत्तर प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी मंदिराजवळ नियोजनासाठी तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या विविध भागातून अयोध्येत पोहोचणाऱ्या भाविकांना संयम आणि सहकार्याचे आवाहन केले. तसेच स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेतली आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसाठी आवश्यक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. भाविकांच्या सोयीसाठी आठ ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत होणारी प्रचंड गर्दी पाहता येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. भाविकांची ही गर्दी पाहता सीएम योगी यांनी स्वत: लखनऊ येथून लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे गर्दीची पाहणी केली. अयोध्येतील भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काही दिवस येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर बंदी घालण्यात येणार आहे. गाड्यांसाठी केलेले सर्व ऑनलाइन बुकिंगही रद्द करण्यात आले असून, भाविकांच्या बसेसचे पैसे परत केले जाणार आहेत. रामललाच्या दर्शनासाठी भाविकांचा मोठा जमाव अयोध्येत पोहोचला तेव्हा प्रधान सचिव संजय प्रसाद आणि कायदा व सुव्यवस्था महासंचालक प्रशांत कुमार स्वतः गर्भगृहात उपस्थित होते. त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.