Karnataka Elections 2018 : जाणून घ्या भाजपाच्या विजयाची पाच कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 01:28 PM2018-05-15T13:28:37+5:302018-05-15T13:28:37+5:30

कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रचार केला होता.

5 reasons of bjp victory in karnataka assembly elections | Karnataka Elections 2018 : जाणून घ्या भाजपाच्या विजयाची पाच कारणं

Karnataka Elections 2018 : जाणून घ्या भाजपाच्या विजयाची पाच कारणं

Next

बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होतो आहे. निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पहायला मिळतं आहे तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची पिढेहाट झाली आहे. कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रचार केला होता. त्याचाच परिणाम निवडणूक निकालावर दिसत असल्याचं जाणकार सांगतात. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोल्समध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तविली गेली होती पण सर्व एक्झिट पोल फोल ठरले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही स्पष्ट बहुमताचा दावा केला होता. 

जाणून घेऊया भाजपाच्या विजयाची पाच कारणं

- नरेंद्र मोदींची जादू
भाजपाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा लोकप्रिय चेहरा आहे. मोदींवर लोक विश्वास दाखवतात. जवळपास सगळ्याच विधानसङा निवडणुकीत भाजपासाठी मोदींचा चेहरा ट्रम्प कार्ड सिद्ध झाला. 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर बिहार आणि दिल्लीची निवडणुक वगळता. नरेंद्र मोदींनी इतर सगळ्या निवडणुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता पण मोदींच्या प्रचाराने तेथिल चित्र काही प्रमाणात बदललं. कर्नाटकात काँग्रेस व भाजपात अटीतटीची लढत पाहायला मिळेल असं बोललं जात होतं. पण मोदींच्या प्रचाराचा परिणाम निकालावर पाहायला मिळाला. 

- भाजपा आणि अमित शहांची रणनिती
भाजपाकडे कार्यकर्त्यांचं चांगलं मंडळ आहे. काँग्रेसच्या तुलनेत हे मंडळ अधिक मजबूत आहे. भाजपाची पकड कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठांपर्यंत आहे. अमित शहा आपली रणनिती बूथ लेवलपासून करतात. त्यामुळे ही रणनिती निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावते.  

- सिद्धरामय्या फॅक्टर
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यात सत्ताविरोधी लाटेचा सामना करत होते. 1985पासून कर्नाटकाच्या जनतेने कुठल्याही राजकीय पक्षावर दोन वेळा विश्वास दाखवला नाही. रामकृष्ठ हेगडे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दलाने सलग दोन वेळा सरकार स्थापन केलं. दुसरीकडे, सिद्धरामय्या सरकारवर विभाजन करणाऱ्या राजकीय रणनिती असल्याचे आरोप लावले गेले. तसंच जातीच्या राजकारणाचेही सिद्धरामय्या यांच्यावर आरोप लावले गेले. भाजपाने हाच मुद्दा पकडून सिद्धरामय्या यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. तसंच भाजपाने सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचारचे जोरदार आरोप केले. 

- लिंगायत कार्डाचा भाजपाला फायदा
कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारने लिंगायत हा वेगळा धर्म घोषित करून मोठी खेळी केली. त्यांनी लिंगायत समाजाच्या लोकांचा वेगळा झेंडा व कर्नाटकसाठी वेगळ्या राष्ट्रगीताची घोषणा केली. यामुळे बराच वाद झाला. टिपू सुल्तानची जयंती साजरी करण्यावरून वाद झाला. लिंगायत समाजाचं संपूर्ण व्होट बँक आपल्याला मिळेल, असा सिद्धरामय्या यांचा समज होता. पण यामुळे दुसऱ्या समाजातील लोक नाराज झाले. अशातच काँग्रेसच्या लिंगायत कार्डाचा फायदा भाजपाला झाला. 

 - येडियुरप्पा आणि श्रीरामुलू यांची वापसी
लिंगायत समाजाचे मोठे नेते बीएस येडियुरप्पा आणि बी श्रीरामुलू यांच्या परतण्याचा भाजपाला मोठा फायदा झाला. यामुळे काँग्रेस विरोधी मतामध्ये एकजूट झाली आणि कर्नाटकमध्ये भाजपाच्या विजयाचा रस्ता मोकळा झाला. 2012 मध्ये येडियुरप्पा आणि श्रीरामलू भाजपातून बाहेर पडले होते. 2013मध्ये त्यांनी वेगळ्या निवडणुका लढल्या. त्या निवडणुकीत भाजपाचं मोठं नुकसान झालं. 2014मध्ये दोन्ही नेते भाजपामध्ये परतले. 
 

Web Title: 5 reasons of bjp victory in karnataka assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.