कोरोना योद्ध्यांच्या पाल्यासाठी वैद्यकीय प्रवेशात ५ जागा राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 02:03 AM2020-11-20T02:03:09+5:302020-11-20T02:04:10+5:30
२०२०-२१च्या शैक्षणिक वर्षासाठी लागू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२०-२१ या शैक्षणिक वषार्साठी एमबीबीएस/बीडीएससाठी प्रवेश देताना केंद्रीय कोट्यातील जागांपैकी पाच जागा कोरोना योद्धांच्या पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ही घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली.
कोरोना साथीच्या रुग्णांवर उपचार करताना या विषाणूची लागण होऊन डॉक्टरसहित जे आरोग्यसेवक मरण पावले किंवा कोरोना उपचाराशी संबंधित कामामध्ये अपघात होऊन मरण पावलेल्यांच्या पाल्यांना वैद्यकीय प्रवेश देण्यासाठी एक नवी श्रेणी केंद्र सरकारने निर्माण केली. खासगी तसेच सरकारी रुग्णालयांतील कोरोना योद्धांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
एमबीबीएस/बीडीएसच्या प्रवेशात पाच जागांवर उमेदवारांची अंतिम निवड मेडिकल कौन्सिल कमिटी करणार आहे.