Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद; 10 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 05:40 PM2021-04-03T17:40:06+5:302021-04-03T17:57:36+5:30
Chhattisgarh Naxal Encounter : नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर येथील तररेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 75 किमी अंतरावर असलेल्या सिलगेर गावाजवळील जोन्नगुडा जंगलात ही चकमक झाली. यामध्ये नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच घटनास्थळावर नक्षलवाद्यांचे काही मृतदेह देखील आढळून आले आहेत. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले आहेत. तर दहा जवान जखमी झाले असून जखमी जवानांना एअरफोर्सच्या हेलिकॉप्टर आणि रुग्णवाहिकेने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
Chhattisgarh: An emergency meeting of DGP DM Awasthi, Special DG (Anti-Naxal Operations) Ashoke Juneja and other officers is underway in Raipur over the encounter between security forces & Naxals in Bijapur in which 5 security personnel have lost their lives.
— ANI (@ANI) April 3, 2021
खोब्रामेंढा जंगलातील चकमकीत पाच नक्षलवादी ठार
कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात चकमक उडत आहे. पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकात आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यावेळी नक्षलवाद्यांचा कॅम्प उध्वस्त करत पोलिसांनी घातपाताचा कट उधळून लावला होता. यानंतर त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले.