५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात, १५ डिसेंबरपूर्वी निकाल, निवडणूक आयोगाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 12:55 PM2023-10-06T12:55:37+5:302023-10-06T13:02:04+5:30

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने आराखडा तयार केला आहे.

5 state assembly polls may be held after Diwali, results before December 15, Election Commission preparations | ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात, १५ डिसेंबरपूर्वी निकाल, निवडणूक आयोगाची तयारी

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात, १५ डिसेंबरपूर्वी निकाल, निवडणूक आयोगाची तयारी

googlenewsNext

या वर्षी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने संभाव्य आराखडा तयार केला आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात आणि राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी एका टप्प्यात मतदान होऊ शकते. निवडणूक आयोगाने ५ राज्यांचा दौरा करून हा आराखडा तयार केला आहे. पाच राज्यांमध्ये नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मतदान घेण्याची योजना आहे.

बारामती अ‍ॅग्रो प्रकरणात आमदार रोहित पवारांना १६ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा

१५ डिसेंबरपूर्वी या सर्व राज्यांमध्ये मतमोजणी होऊ शकते. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या मान्यतेनंतर निवडणूक कार्यक्रमाला अंतिम मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर घोषणा केली जाईल. आज होणाऱ्या निरीक्षकांच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होणार आहे.

मिझोरम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर रोजी संपत आहे. भाजपचा मित्रपक्ष मिझो नॅशनल फ्रंट ईशान्येकडील राज्यात सत्तेत आहे. तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभांचा कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारीमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती तेलंगणात सत्तेवर आहे, तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने राजस्थान, मिझोराम, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी रणनीती आखण्यासाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी आपल्या निरीक्षकांची बैठक बोलावली आहे.

Web Title: 5 state assembly polls may be held after Diwali, results before December 15, Election Commission preparations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.