५ हजार हस्तलिखित भुर्जपत्रे असुरक्षित
By admin | Published: June 11, 2016 06:15 AM2016-06-11T06:15:42+5:302016-06-11T06:15:42+5:30
दक्षिण ओडिशा सांस्कृतिक अभ्यास केंद्राच्या (एसओसीएससी) अभिलेखागारात भुर्जपत्रावर लिहिलेली किमान ५००० हस्तलिखिते निधीअभावी कोणत्याही दुर्लक्षित पडली
बऱ्हाणपूर : ओडिशातील बऱ्हाणपूर विद्यापीठाच्या दक्षिण ओडिशा सांस्कृतिक अभ्यास केंद्राच्या (एसओसीएससी) अभिलेखागारात भुर्जपत्रावर लिहिलेली किमान ५००० हस्तलिखिते निधीअभावी कोणत्याही दुर्लक्षित पडली आहेत.
काही हस्तलिखिते १८ व्या शतकातील आहेत आणि त्या विद्यापीठाच्या ओडिया इतिहास विभाग, क्षेत्रीय अभ्यास केंद्र व काही लोकांनी ती गोळा केली होती. ‘या हस्तलिखितांची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी पुरेसा निधी आणि कर्मचारी वर्गही नाही. अपुऱ्या संसाधनांमध्येच आम्ही या भुर्जपत्रांना सुरक्षित ठेवण्याचा आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत, असे संचालक डी. पी. पटनायक यांनी सांगितले.
विद्यापीठाने या हस्तलिखितांवर अंकित मजकूर नोंदवून घेण्यासाठी एक कर्मचारी आहे. एकूण ५०० हस्तलिखितांना तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित मिशनअंतर्गत आणण्यात आले होते.
विद्यापीठाने डिजिटायजेशनसाठी जर्मनीत संपर्क साधला आहे. यातील ओडिया भुर्जपत्र हे उपेंद्र भांजा यांचे असून ते संस्कृतमध्ये आहे आणि तंत्र व आयुर्वेद हा त्यांचा विषय आहे, असे पटनायक यांनी सांगितले.
नॅशनल असेसमेंट अॅण्ड अॅक्रीडिटेशन कौन्सिलने विद्यापीठाला हस्तलिखिते योग्यपणे संरक्षित करून ठेवल्याबद्दल प्रशंसा केली होती. या हस्तलिखितांचे संरक्षण करण्यात यावे, अशी विनंती आम्ही नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशनकडे करणार आहोत, असे विद्यापीठाचे कुलगुरू दीपककुमार बेहेरा म्हणाले. (वृत्तसंस्था)