फेसबुकवर बोगस अकाऊंट ओळखण्याच्या 5 टिप्स

By admin | Published: July 12, 2016 04:34 PM2016-07-12T16:34:00+5:302016-07-12T17:31:41+5:30

अनोळखी व्यक्तीकडून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल तर हे बोगस अकाऊंट आहे की नाही ओळखण्यासाठी या 5 टिप्स तुमची मदत करतील

5 Tips to Find a Bogus Account on Facebook | फेसबुकवर बोगस अकाऊंट ओळखण्याच्या 5 टिप्स

फेसबुकवर बोगस अकाऊंट ओळखण्याच्या 5 टिप्स

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 12 - सोशल मिडिया अनेकांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनलं आहे. यामध्ये फेसबूक अग्रेसर आहे. फेसबूकचे अनेक फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटेही आहेत. फेसबूकवर बोगस अकाऊंटने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. नवीन लोकांशी मैत्री करण्याच्या नादात अनेकजण कोणतीही पडताळणी न करता अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारतात. अशा बोगस अकाऊंटवरुन झालेली फसवणूक अनेकदा पाहायला मिळते. 
 
व्हायरस पसरवणे किंवा मैत्री करुन तुमची आर्थिक माहिती गोळा करणे असे हेतू हे बोगस अकाऊंट तयार करण्यामागे असतात. फेसबूक अनेकदा आपण उत्तम आणि सुरक्षित सेवा पुरवत असल्याचा दावा करते, पण दुर्देवाने फेसबूक अशा बोगस अकाऊंट्सना रोखण्यात अपयशी ठरलेलं दिसतं. अशावेळी तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल तर हे बोगस अकाऊंट आहे की नाही ओळखण्यासाठी या 5 टिप्स तुमची मदत करतील. 
 
1) रिव्हर्स इमेज सर्च
प्रोफाईल फोटोमध्ये असणा-या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्चचा उपयोग करा. बोगस अकाऊंट आहे की नाही ओळखण्यासाठी हा सर्वात जलद उपाय आहे. 
 
रिव्हर्स इमेज सर्च कशाप्रकारे काम करते ? 
रिव्हर्स इमेज सर्चमध्ये तुम्ही टाकलेला फोटो इनपूट म्हणून घेतला जातो आणि त्याच्याशी संबंधित फोटो इंटरनेटवर सर्च केले जातात. प्रोफाईल फोटोमध्ये असणारी व्यक्ती खरी आहे की खोटी हे माहिती पडणं यामुळे सोपं जातं. जर फेसबूक अकाऊंट बोगस नसेल तर तुम्हाला त्याच व्यक्तीचा तोच फोटो किंवा संबंधित फोटो इंटरनेटवर लगेच मिळेल ज्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटणं सोप्प जाईल.
 
2) अनेक बोगस अकाऊंटमध्ये एकच फोटो असतो
जर एखाद्याच्या फेसबूक प्रोफाईलमध्ये तिचा किंवा त्याचा एकच फोटो असेल तर मग ते बोगस अकाऊंट आहे हे नक्की. अनेक बोगस अकाऊंटमध्ये एकच फोटो असतो. 
 
3) टाईमलाईन तपासा
त्या व्यक्तीने फेसबूक अकाऊंट कधी सुरु केलं हे तपासा. अनेक बोगस अकाऊंट फक्त एका आठवड्यापुर्वीच सुरु केलेली असतात. त्या एका आठवड्यातच त्यांनी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यास सुरुवात केलेली असते. 
 
4) मुलींच्या बोगस प्रोफाईलपासून सावधान
अनेक बोगस अकाऊंट मुलींच्या नावे सुरु केलेली असतात. मुलींच्या नावे आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट अनेकदा डोळे झाकून स्विकारल्या जातात, पण मुलींच्या नावेच जास्त बोगस अकाऊंट असतात. त्यामुळे मुलींशी मैत्री करताना खात्री बाळगा.
 
5) फ्रेंड लिस्ट चेक करा
त्या व्यक्तींची फ्रेंड लिस्ट पाहून घ्या. फ्रेंड लिस्टमध्ये असणा-या व्यक्तींवरुन तुम्हाला अंदाज येईल. जर तुमचे म्युचूअल फ्रेंड जास्त असतील तर तुमच्या एखाद्या मित्राने गंमत म्हणून हे अकाऊंट बनवलं असण्याची शक्यता आहे. 
 
- शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा बोगस अकाऊंट असल्याचं लक्षात आल्यानंतर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपण वाचलो म्हणत विषय सोडून देतो. पण असं न करता या बोगस अकाऊंटची माहिती फेसबूकला कळवा आणि तुमच्या मित्रांनाही याची माहिती द्या. जेणेकरुन त्यांच्यापैकी कोणाला फ्रेंड रिक्वेस्ट गेल्यास त्यांना हे अकाऊंट बोगस आहे याची कल्पना असावी.
 

Web Title: 5 Tips to Find a Bogus Account on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.