आश्वी दूध संस्थेच्या ५ जागा बिनविरोध

By admin | Published: December 31, 2014 12:06 AM2014-12-31T00:06:02+5:302014-12-31T18:55:13+5:30

आश्वी खुर्द सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीत ५ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १२ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत.

5 unincorporated bodies of Ashd milk production | आश्वी दूध संस्थेच्या ५ जागा बिनविरोध

आश्वी दूध संस्थेच्या ५ जागा बिनविरोध

Next

आश्वी : आश्वी खुर्द सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीत ५ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १२ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत.
४ जानेवारीला संस्थेची निवडणूक होत आहे. संस्था स्थापनेपासून २५ वर्षांत एकदाही निवडणूक झाली नव्हती. मात्र यंदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडीत झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मंगळवारी माघारीच्या दिवशी संपत नाना मोरे (अनुसूचित जाती-जमाती), संगीता कैलास गायकवाड (महिला राखीव), भागूबाई बबन गायकवाड (महिला राखीव), शिवाजी निवृत्ती शिंदे (इतर मागासवर्ग), बाजीराव रभाजी दातीर (भटक्या जाती-जमाती) असे एकूण ५ उमेदवारांचे एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले. तर सर्वसाधारण १२ जागांसाठी बाबासाहेब गोविंद भोसले, बाबासाहेब प्रताप भवर, योगेश रामचंद्र भोसले, बाबासाहेब संपत गायकवाड, विष्णू भिमाजी गायकवाड, विजय विठ्ठल गायकवाड, ज्ञानदेव बबन मांढरे, दिलीप सुखदेव मांढरे, अनिल गोपीनाथ शिंदे, सखाहरी येसू सोनवणे, नामदेव किसन शिंदे, विजय माधवराव भोसले, जगन्नाथ पाटीलबा गायकवाड, साहेबराव कारभारी गायकवाड, विठ्ठल नाथू गायकवाड, भाऊसाहेब संपत शिंदे असे १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. (वार्ताहर)

Web Title: 5 unincorporated bodies of Ashd milk production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.