फूटपाथवर चालणाऱ्या 5 महिलांना भरधाव कारने चिरडले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 08:25 PM2023-10-19T20:25:42+5:302023-10-19T20:26:09+5:30

हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

5 women walking on the footpath were crushed by a speeding car, a shocking video of the accident was revealed... | फूटपाथवर चालणाऱ्या 5 महिलांना भरधाव कारने चिरडले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर...

फूटपाथवर चालणाऱ्या 5 महिलांना भरधाव कारने चिरडले, अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर...

Mangaluru Accident Video Viral: कर्नाटकातून अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. मंगळुरुमध्ये भरधाव कारने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक दिली, या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर इतर जखमी झाल्या.

ही घटना काल(18 ऑक्टोबर) रोजी घडली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये काही महिला फूटपाथवरून चालताना दिसत आहेत. यावेळी एक भरधाव कार त्यांना पाठीमागून जोरदार धडक देते. कारचालक आधी फूटपाथवरून चालणाऱ्या चार महिलांना तर धडकतो, पुढे वळताना आणखी एका महिलेला उडवतो. धक्कादायक बाब म्हणजे 5 महिलांना धडक देऊनही चालक गाडी थांबवत नाही. 

अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे लोक महिलांच्या मदतीसाठी धावून येतात. या अपघातात 4 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत, तर एकीचा मृत्यू झाला आहे. रुपश्री असे मृत महिलेचे नाव आहे. रूपश्री ही सुरथकल भागातील रहिवासी होती. या घटनेत जखमी झालेल्या उर्वरित 4 महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

आरोपीचे आत्मसमर्पण 
कमलेश बलदेव (57) असे कार चालकाचे नाव आहे. कमलेश याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. या घटनेनंतर कमलेशने आपली कार एका शोरूमजवळ उभी करून तेथून पळ काढला. काही वेळाने त्याने वडिलांसोबत पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. याप्रकरणी कमलेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कमलेशला अटक केली आहे.

Web Title: 5 women walking on the footpath were crushed by a speeding car, a shocking video of the accident was revealed...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.