पाच वर्षीय मुलाचा ‘नरबळी’; जमावाने मांत्रिकाला पेटविले

By admin | Published: October 1, 2015 10:34 PM2015-10-01T22:34:43+5:302015-10-01T22:34:43+5:30

आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात देवाला प्रसन्न करण्यासाठी पाच वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचे उघडकीस येताच संतप्त जमावाने मांत्रिकाला खांबाला

5-year-old boy's 'body-fire'; The crowd is pushing the mantra | पाच वर्षीय मुलाचा ‘नरबळी’; जमावाने मांत्रिकाला पेटविले

पाच वर्षीय मुलाचा ‘नरबळी’; जमावाने मांत्रिकाला पेटविले

Next

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात देवाला प्रसन्न करण्यासाठी पाच वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचे उघडकीस येताच संतप्त जमावाने मांत्रिकाला खांबाला बांधून पेटविल्याने खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेपोटी निष्पाप बालकाचा बळी घेणारा मांत्रिक रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोकुरू हे छोटेसे गाव या घटनेमुळे सुन्न झाले आहे. ३० वर्षीय मांत्रिक तिरुमाला राव याने पाच वर्षांच्या मुलाचे शिर कापून ते रक्त भांड्यात गोळा करून घरात शिंपडण्याचा विधी पार पाडल्यानंतर नरबळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक एम. लक्ष्मण यांनी दिली.
तिरुमाला याने या मुलाला अंगणवाडीतून आपल्या घरी नेले होते. मुलाची आई अंगणवाडीत गेली असता तिला तेथे मुलगा आढळून आला नाही. तिने विचारपूस करताच तो तिरुमाला याच्यासोबत गेल्याची माहिती मिळाली. लगेच गावकरी तिरुमालाच्या घरी धडकले असता तेथे कुलूप आढळून आले. गावकऱ्यांनी कुुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर या मुलाचा मृतदेह आढळून आला.
या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी तिरुमाला याला ओढत नेत खांबाला बांधले. रॉकेल ओतून पेटवून दिले. वेळीच धावलेल्या पोलिसांनी तिरुमाला याची सुटका केली. तो होरपळल्यामुळे गंभीर जखमी झाला असून त्याला ओंगोले येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 5-year-old boy's 'body-fire'; The crowd is pushing the mantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.