मोबाइलमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी आढळल्यास ५ वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 02:43 AM2018-11-24T02:43:42+5:302018-11-24T02:45:16+5:30
मुलांच्या सुरक्षेशी संबंधित पॉक्सो कायद्यात केंद्र सरकार दुरुस्ती करणार आहे. त्यानुसार प्रथमच मोबाइल, कॉम्प्युटर किंवा पुस्तक रूपाने मुलांशी संबंधित चाइल्ड पोर्नोग्राफी आढळून आल्यास पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद होईल.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : मुलांच्या सुरक्षेशी संबंधित पॉक्सो कायद्यात केंद्र सरकार दुरुस्ती करणार आहे. त्यानुसार प्रथमच मोबाइल, कॉम्प्युटर किंवा पुस्तक रूपाने मुलांशी संबंधित चाइल्ड पोर्नोग्राफी आढळून आल्यास पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद होईल.
अनेक जण लोक मोबाइल वा कॉम्प्युटरमध्ये लहान मुलांशी संबंधित पोर्नोग्राफिक व्हिडीओ स्टोअर करतात. पोलीस किंवा तपास यंत्रणांनी चौकशी केल्यास मला कोणीतरी मेल-व्हॉटसअॅप केला होता. मी तो पाहिला वा पाठवला नाही, असे ते सांगतात. अनेकदा अशी पुस्तकेही जवळ बाळगतात व अमक्याने ते मला दिले, असे सांगतात.
सध्या मुलांवर झालेला लैंगिक अत्याचार वा लैंगिक छळ पॉक्सो कायद्यात समाविष्ट आहे. पोर्नोग्रॉफीत मुलांना सहभागी करून घेणाऱ्यांनाही शिक्षेची तरतूद आहे. परंतु, मोबाइल, कॉम्प्युटर इतर इलेक्ट्रॉनिक किंवा इतर प्रकारच्या उपकरणांत ते बाळगण्यास बंदी असल्याचा स्पष्ट उल्लेख या कायद्यामध्ये नाही. आता मात्र केंद्र सरकार कायद्याद्वारे अशी कठोर तरतूद करणार आहे.