५० देशांचे नौदल भारताच्या किनारी

By Admin | Published: February 7, 2016 01:48 AM2016-02-07T01:48:47+5:302016-02-07T01:48:47+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी ‘आयएनएस सुमित्रा’ या जहाजावरून भारतीय नौदलाच्या विलक्षण कौशल्याची आणि तयारीची पाहणी केली. ५० देशांचा सहभाग असलेल्या

50 countries boats for India | ५० देशांचे नौदल भारताच्या किनारी

५० देशांचे नौदल भारताच्या किनारी

googlenewsNext

विशाखापट्टणम : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी ‘आयएनएस सुमित्रा’ या जहाजावरून भारतीय नौदलाच्या विलक्षण कौशल्याची आणि तयारीची पाहणी केली. ५० देशांचा सहभाग असलेल्या या भव्य अशा आंतरराष्ट्रीय संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
भारतीय नौदलाचे ‘आयएनएस सुमित्रा’ हे खास जहाज राष्ट्रपतींसाठी आहे. तिन्ही सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती असलेल्या मुखर्जी यांच्यासोबत यावेळी ‘आयएफआर (इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्णू) २०१६’ या लढाऊ गलबतांची पाहणी करण्यासाठी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही लढाऊ गलबतांची ११ वी पाहणी आहे. भारतात अशा प्रकारच्या कवायती घेण्याची ही दुसरी वेळ आहे.
या गलबतांची पाहणी केल्यानंतर प्रणव मुखर्जी म्हणाले की, ‘‘या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जगातील ५० देशांनी आपल्या नौदलाची जहाजे किंवा प्रतिनिधी पाठविले आहेत. जगातील नौदल देशाबद्दलची आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी आणि नौदल कर्मचारी देश यांच्यातील नाते घट्ट करण्यासाठी असे उपक्रम राबविते. ही बाब आयएफआर २०१६ ने खूप जास्त प्रमाणात करून दाखविली आहे. आयएफआर २०१६ चा सगळा झोत हा भारतीय नौदलाच्या विलक्षण कौशल्यावर होता.
या उपक्रमात भारतीय किनाऱ्यावर जगातील ५०
देशांनी सहभाग घेतला व त्यातून शांतता, सहकार्य आणि मैत्रीसाठी समुद्राचा वापर व्हावा, तसेच सागरी किनाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी भागीदारीचा विकास व्हावा या आमच्या सामाईक इच्छेला त्याने पावतीच दिली, असेही मुखर्जी म्हणाले.

Web Title: 50 countries boats for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.