हैदराबादमधील 50 IT कंपन्यांना पाकिस्तानी हॅकर्सचा फटका

By admin | Published: October 14, 2016 10:10 AM2016-10-14T10:10:07+5:302016-10-14T10:38:56+5:30

गेल्या दहा दिवसांपासून हैदराबादमधील जवळपास 50 आयटी कंपन्यांना पाकिस्तानी हॅकर्सने टार्गेट केले आहे. या सायबर हल्ल्यात शहरातील मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे.

50 IT companies in Hyderabad are hit by Pakistani hackers | हैदराबादमधील 50 IT कंपन्यांना पाकिस्तानी हॅकर्सचा फटका

हैदराबादमधील 50 IT कंपन्यांना पाकिस्तानी हॅकर्सचा फटका

Next

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 14 - गेल्या दहा दिवसांपासून हैदराबादमधील जवळपास 50 आयटी कंपन्यांना पाकिस्तानी हॅकर्सने टार्गेट केले आहे. या सायबर हल्ल्यात 'सोसायटी फॉर सायबराबाद सिक्युरिटी काऊन्सिल' (SCSC)सह शहरातील मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  साईटवरुन कुणीतरी माहिती चोरी करण्याचा प्रयत्न असल्याचे निर्दशनास आल्यानंतर सोसायटी फॉर सायबराबाद सिक्युरिटीला ही बाब समजली. 

पाकिस्तानी हॅकर्स भारतीय कंपन्यांवर सायबर अटॅक करण्यासाठी तुर्की, सोमालिया आणि सौदी अरेबियामधून सर्व्हर वापरत आहेत, अशी माहिती सायबर सुरक्षा फोरमच्या अधिका-यांनी दिली आहे.या हल्ल्यानंतर काही समस्या सोडवण्यात आल्या आहेत, मात्र अन्य कंपन्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये येथे झालेले सायबर अटॅक हे पाकिस्तानातून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. काही कंपन्यांनी याबाबत तक्रार नोंदवत आयटी कॉरीडोरच्या सुरक्षेची मागणी केली आहे. 

भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन उरी हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर गेल्याकाही दिवसांपासून बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारतावर वेगवेगळ्या भ्याड पद्धतीचे हल्ले चढवणे सुरूच आहे. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी हॅकर्सने 7 हजारपेक्षा अधिक भारतीय वेबसाईट्स हॅक केल्याचा दावा केला आहे.
 
 

 

Web Title: 50 IT companies in Hyderabad are hit by Pakistani hackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.