गौण खनिज चोरांकडून ५० लाखांचा दंड वसूल २२ दिवसातील कारवाई : जळगाव तालुक्यातून ९ लाखांचा दंड
By admin | Published: December 23, 2015 12:17 AM2015-12-23T00:17:46+5:302015-12-23T00:17:46+5:30
जळगाव : वाळू वाहतुकीला बंदी असताना चोरटी वाळू वाहतूक करणार्या तसेच विनापरमिट गौण खनिजाची वाहतूक करणार्या ३३७ वाहनधारकांकडून तहसीलदारांनी महिनाभरात तब्बल ५० लाख ६१ हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
Next
ज गाव : वाळू वाहतुकीला बंदी असताना चोरटी वाळू वाहतूक करणार्या तसेच विनापरमिट गौण खनिजाची वाहतूक करणार्या ३३७ वाहनधारकांकडून तहसीलदारांनी महिनाभरात तब्बल ५० लाख ६१ हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.जिल्ातील गिरणा, तापी यासह अन्य नदीपात्रातील वाळूच्या लिलावाची सप्टेंबर महिन्यात मुदत संपली. त्यानंतर वाळूची चोरटी वाहतूक सुरू झाली. जिल्हा प्रशासनाने परवानगी नसताना वाळूची चोरटी वाहतूक करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तहसीलदारांनी पथक तयार करीत कारवाईला वेग दिला. यात विनापरमिट खडी, डबर, मुरुम व मातीची वाहतूक करणार्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. जिल्हाभरातील तहसीलदारांनी १ ते २२ डिसेंबर या कालावधित तब्बल ३३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली.जळगावात सर्वाधिक कारवाईसर्वाधिक कारवाई जळगाव तहसीलदारांनी केली. ४६ वाहने ताब्यात घेतली. त्यात ९ लाख २८ हजार ५०० रुपयांच्या दंडाची आकारणी करण्यात आली आहे. तर सर्वात कमी कारवाई ही अमळनेर तहसीलदारांनी केली आहे. या तालुक्यात केवळ पाच वाहनांवर कारवाई करून ४२ हजार ५२० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखलअवैध गौण खजिन वाहतूकदारांविरुद्ध दंडात्मक कारवाईसोबतच काही तहसीलदारांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात जळगाव तहसीलदारांनी एक, जामनेर तहसीलदारांनी एक, पाचोरा व अमळनेर तहसीलदारांनी प्रत्येकी दोन अशा सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.चौकटतालुकावाहने कारवाईजळगाव४६९२८५००चोपडा३६५०७६००यावल २८४९०८१०भुसावळ२७४५९४००रावेर ५३४५०५००भडगाव२२३८८६३०बोदवड१७३३१३२५पाचोरा२३३१२१६०जामनेर१८३१०८००चाळीसगाव२८३०६३९०एरंडोल११२०९४००धरणगाव०७१७७०००पारोळा०४८१६००मुक्ताईनगर१२६४८४०अमळनेर०५४२५२०एकुण ३३७५०६१४७५