एटीएममधून मिळणार ५०च्या नोटा
By admin | Published: September 26, 2015 03:26 AM2015-09-26T03:26:23+5:302015-09-26T03:26:23+5:30
येत्या काही दिवसांत एटीएममधून १०००, ५००, १०० रुपयांसह ५० रुपयांच्या नोटाही काढता येतील. याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना निर्देश दिले आहेत
Next
नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत एटीएममधून १०००, ५००, १०० रुपयांसह ५० रुपयांच्या नोटाही काढता येतील. याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना निर्देश दिले आहेत. सध्या एटीएममधून १०० रुपये आणि त्यावरील नोटा काढता येतात. त्यापेक्षा कमी रकमेच्या नोटा निघत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची अडचण होते. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एटीएममध्ये
५० रुपयांच्या नोटा टाकण्याबाबत निर्देश दिले आहेत. ग्राहकांना कमी रकमेच्या नोटा मिळाव्यात असा त्यामागचा उद्देश आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानंतर काही बँकांनी आपल्या एटीएममध्ये ५० रुपयांच्या नोटा टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)