दहावी, बारावी परीक्षेत ५० टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 03:52 AM2020-04-26T03:52:56+5:302020-04-26T03:53:06+5:30

१० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेत पुढील वर्षी म्हणजे २०२१ पासून ४० ते ५० टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील. हा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठविला आहे.

50% objective questions in 10th and 12th exams? | दहावी, बारावी परीक्षेत ५० टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह?

दहावी, बारावी परीक्षेत ५० टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह?

Next

एस. के. गुप्ता 
नवी दिल्ली : सीबीएसईने परीक्षा प्रणालीत सुधारणांसाठी नवी ब्लू प्रिंट तयार केली आहे. यामुळे बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सोपा होणार आहे. नव्या बदलानुसार, १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेत पुढील वर्षी म्हणजे २०२१ पासून ४० ते ५० टक्के प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील. हा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठविला आहे.
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता परीक्षा पॅटर्नमध्ये महत्त्वपूर्ण बदलास ही परवानगी मागण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बोर्डाने यावर्षी १० वी १२ वीच्या परीक्षेत २०-२० टक्के आॅब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले आहेत.
पुढील वर्षी या प्रश्नांची संख्या ४० ते ५० टक्के करण्याची परवानगी मंत्रालयास मागण्यात आली आहे. याशिवाय अन्य एका प्रस्तावात भविष्यात केवळ भाषा विषयांसाठी लिखित परीक्षा आणि अन्य विषयांसाठी आॅब्जेक्टिव्ह पॅटर्न करण्याचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे प्री-बोर्ड अथवा होम टेस्ट होतील.
>विद्यार्थ्यांना काय
आहे फायदा?
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेनंतर जेईई मेन, अ‍ॅडव्हान्स वा नीट यासारख्या परीक्षाही आॅब्जेक्टिव्ह द्याव्या लागतील.
परीक्षेचा पॅटर्न सोपा बनेल. विद्यार्थी बोर्ड परीक्षेच्या तणावातून मुक्त होतील.
विद्यार्थ्यांची लिखित क्षमता भाषा विषयात दिसून येईल.
बोर्डाला काय फायदा होईल?
दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. यावर्षी १० वी १२ वीत एकूण ३१ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. आॅब्जेक्टिव्ह पॅटर्नमुळे निकालही लवकर तयार होईल.
परीक्षेचे आयोजन १०० टक्के कॉम्प्युटर बेस्ड होईल.
उत्तरपत्रिका तपासण्यासाठी अधिक शिक्षकांची गरज भासणार नाही. निकालही वेळेवर लागतील.

Web Title: 50% objective questions in 10th and 12th exams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.