CoronaVirus News: पुणे, मुंबई, ठाण्यासह पाच शहरांत देशातील ५० टक्के कोरोना रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 03:52 AM2020-06-14T03:52:53+5:302020-06-14T06:45:18+5:30
भारत चौथ्या क्रमांकावर; महाराष्ट्र सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य
नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ५० टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई या पाच शहरांमध्येच आहेत. जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये प्रथम स्थानी अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल व तिसऱ्या स्थानी रशिया आहे. देशामध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असून एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३२ टक्के आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे एक लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. महाराष्ट्र व तमिळनाडूतील कोरोना रुग्णांची एकत्र केली तर ती एकूण रुग्णसंख्येच्या ४५ टक्के इतकी होते. देशात मुंबई, पुणे, ठाणे, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई, जयपूर येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईमध्ये ५५ हजारांपेक्षा अधिक रुग्ण असून ही संख्या स्वीडन, इजिप्त, यूएईमधील रुग्णांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. यामुळे मुंबईत २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.