पुढच्या निवडणुकीत ५० टक्के मते मिळणार; मोदींनी विरोधकांच्या INDIA समोर ठेवला NDA चा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 09:33 PM2023-07-18T21:33:28+5:302023-07-18T21:36:41+5:30

सत्तेच्या मजबुरीमुळे जेव्हा युती केली जाते, जेव्हा युती भ्रष्टाचाराच्या इराद्याने होते, जेव्हा युती घराणेशाहीच्या धोरणावर आधारित असते, जेव्हा युती जातीवाद आणि प्रादेशिकता डोळ्यासमोर ठेवून केली जाते, तेव्हा देशाचे खूप नुकसान करणारी ठरते, अशी टीका मोदी यांनी केली. 

50 percent of the votes in the next election 2024; PM Narendra Modi explained the meaning of NDA in meeting | पुढच्या निवडणुकीत ५० टक्के मते मिळणार; मोदींनी विरोधकांच्या INDIA समोर ठेवला NDA चा अर्थ

पुढच्या निवडणुकीत ५० टक्के मते मिळणार; मोदींनी विरोधकांच्या INDIA समोर ठेवला NDA चा अर्थ

googlenewsNext

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीला संबोधित करताना विरोधकांच्या एकजुटीवर टीका केली आहे. एनडीए कोणाच्य़ा विरोधात बनलेले नाही, देशात स्थिरता आणण्यासाठी एनडीएची स्थापना झाली होती. परंतू, विरोधक हे सत्तेसाठी, भ्रष्टाचारासाठी आणि एनडीएला विरोध करण्यासाठी एकत्र आलेले आहेत, अशी जोरदार टीका मोदी यांनी केली. 

काँग्रेसने य़ा पक्षांचा वापर आपल्या हितासाठी केला. आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा सकारात्मक राजकारण केले, कधीही नकारात्मक राजकारण केलेले नाही. आम्ही विरोधात राहुन सरकारचा विरोध केला. त्यांचे घोटाळे समोर आणले परंतू जनादेशाचा अपमान केला नाही. तसेच विदेशी शक्तींकडे देखील मदत मागितली नाही. एनडीएला 2014 मध्ये सुमारे 38 टक्के आणि 2019 मध्ये 45 टक्के मते होती, 2024 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक मते मिळतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

सत्तेच्या मजबुरीमुळे जेव्हा युती केली जाते, जेव्हा युती भ्रष्टाचाराच्या इराद्याने होते, जेव्हा युती घराणेशाहीच्या धोरणावर आधारित असते, जेव्हा युती जातीवाद आणि प्रादेशिकता डोळ्यासमोर ठेवून केली जाते, तेव्हा देशाचे खूप नुकसान करणारी ठरते, अशी टीका मोदी यांनी केली. 

एनडीएच्या स्थापनेत अडवाणींनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अटलजींचा वारसा एनडीएला बांधून ठेवत आहे. एनडीएच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. NDA म्हणजे N-New India, D- Developed Nation, A- People's Aspiration आहे, असा मोदींनी विरोधकांच्या इंडियाच्या विरोधात एनडीएचा अर्थ सांगितला. आज विरोधक आमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण देशातील 140 कोटी देशवासी सर्व काही पाहत आहेत. हा स्वार्थी विरोध का जमवला जातोय ते त्यांना माहीत आहे, असे मोदी म्हणाले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला पुन्हा एनडीएचे सरकार येणार आहे. देशभरात एनडीएला ५० टक्के मते मिळतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. यावेळी मोदी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आपल्यासोबत आले असल्याचे म्हटले. 
 

Web Title: 50 percent of the votes in the next election 2024; PM Narendra Modi explained the meaning of NDA in meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.