५० टक्क्यांवर लोक मानसिक व लैंगिक समस्यांनी ग्रस्त
By admin | Published: December 30, 2015 02:22 AM2015-12-30T02:22:38+5:302015-12-30T02:22:38+5:30
देशातील ५० टक्क्यांवर लोक मानसिक व लैंगिक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच विविध समस्यांसाठी डॉक्टरांकडे सल्ला घेणास जाणाऱ्या लोकांच्या तुलनेत या समस्यांनी ग्रस्त लोकांची
नवी दिल्ली : देशातील ५० टक्क्यांवर लोक मानसिक व लैंगिक समस्यांनी ग्रस्त आहेत. त्यामुळेच विविध समस्यांसाठी डॉक्टरांकडे सल्ला घेणास जाणाऱ्या लोकांच्या तुलनेत या समस्यांनी ग्रस्त लोकांची संख्याही जास्त आहे. ‘लाइब्रेट हेल्थेस्केप इंडिया २०१५’च्या अहवालातून हे तथ्य समोर आले आहे.
‘लाइब्रेट’ भारतातील पहिला व सर्वात मोठा ‘आॅनलाईन हेल्थकेअर कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म’ आहे. या ठिकाणी रुग्णाला थेट डॉक्टरांशी संवाद साधता येतो. ‘लाइब्रेट’च्या अहवालानुसार, देशात लैंगिक, मानसिक, जीवनशैलीशी संबंधित, आहार व पोषण संदर्भातील तसेच महिलाविषयक, त्वचाविषयक आणि बाल आरोग्यविषयक अशा सात मुख्य आरोग्य समस्या आहेत. लैंगिक आजारांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३२ टक्के आहे तर मानसिक विकारांचे प्रमाण २१ टक्के आहे. सुमारे १५ टक्के लोकांना जीवनशैलीशी संबंधित आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत. १२ टक्के लोकांना आहार व पोषणविषयक आरोग्य तक्रारी आहेत. ११ टक्के आरोग्यविषयक समस्या या महिला आरोग्याशी संबंधित आहेत. त्वचेविषयक आजारांचे प्रमाण ५ टक्के तर बाल आरोग्यविषयक समस्यांचे प्रमाण ४ टक्के आहे. यावर्षी १ जानेवारी ते डिसेंबर या काळात ‘लाइब्रेट’च्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधणाऱ्या सुमारे ५ कोटी रुग्णांच्या आरोग्य समस्यांचे विश्लेषण केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.