५० हजारासाठी विवाहितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By admin | Published: January 24, 2017 09:53 PM2017-01-24T21:53:14+5:302017-01-24T21:53:14+5:30
माहेराहून ५० हजार रुपये न आणल्याने येथील डॉक्टर पती व सासू-सासऱ्याने विवाहितेवर रॉकेल टाकून
Next
>ऑनलाइन लोकमत
चिखली (बुलडाणा), दि. 24 - माहेराहून ५० हजार रुपये न आणल्याने येथील डॉक्टर पती व सासू-सासऱ्याने विवाहितेवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना २२ जानेवारी रोजी स्थानिक संभाजी नगरमध्ये घडली. या घटनेतून बचावलेल्या विवाहीतेच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार मालगणी येथील प्रतिभा शेळके वय
२५ वर्षे यांचे येथील संभाजी नगरमधील अमोल शेळके यांच्याशी गत २९ एप्रिल २०१६ रोजी लग्न झाले आहे. अमोल शेळके बीएएमएस डॉक्टर असून सिपोरा येथे दवाखाना देखील आहे. दरम्यान लग्न झाल्यानंतर सुरूवातीला दोन तीन महिने सासरच्यांची चांगली वागणूक दिल्यानंतर माहेराहून दवाखान्यासाठी १ लाख रुपये आणण्यासाठी छळ चालविला होता व वारंवार तगदा लावल्याने प्रतिभा शेळके यांनी माहेराहून ५० हजार रूपये आणून दिले होते. तरीसुध्दा उर्वरीत ५० हजारासाठी सासरच्यांची त्यांचा छळ सुरूच ठेवला होता. अशातच रेखा बैरागी रा.आश्वी (संगमनेर) ही महिला त्यांच्या घरी दाखल झाली व तिने अमोल शेळकेने तिच्याशी मंदिरात लग्न केले असल्याचे सांगतीले. तसेच अमोलने तुझ्याशी फक्त पैशासाठी लग्न केले असल्याचे सांगीतल्यावरून प्रतिभा यांनी पतीकडे याबाबत जाब विचारला. मात्र, त्याने याबाबत उत्तर देण्याचे टाळून पैशासाठी त्रास देणे सुरूच ठेवले होते. दरम्यान मकरसंक्रातीला माहेरी जायचे असेल तर येतांना ५० हजार रूपये घेवून ये असा तगादा देखील लावला होता. त्यानुसार १० जानेवारी रोजी माहेरी गेलेल्या प्रतिभा शेळके ह्या २२ जानेवारी रोजी परत सासरी गेल्यानंतर सासरच्यांनी त्यांच्याकडे माहेराहून
५० हजार रूपये आणले का असे विचारले त्यांनी नकार दिल्याने पती अमोल शेळके, सासरा शामराव शेळके व सासु नंदाबाई शळके यांनी बाचाबाची केली तर दुपारी ३ वाजेच्या सुमारास पतीसह सासु-सासºयाने केस पकडून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व घरातील रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न चालविला असता प्रतिभा शेळके यांनी आरडाओरड करीत त्यांच्यापासून सुटका करून घेतली व घराबाहेर पळाल्याने परिसरातील नागरीक जमा झाल्याने पती व सासु-सासºयांनी घर लावून घेत पळ काढला. दरम्यान शेजाऱ्यांच्या मदतीने सदर घटनेबाबतची माहिती वडिलांना दिल्यानंतर वडिल शिवाजी रामकृष्ण चिंचोले यांच्यासह चिखली पोलिसांत याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पती अमोल शामराव शेळके, सासरा शामराव शेळके व सासु नंदाबाई शेळके यांच्याविरुध्द कलम ३०७, ४९८(ऐ), ३२९, ५०४, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)